26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeChiplunशासनाने आमची फसवणूक केली, महागाईने होरपळली सामान्य जनता

शासनाने आमची फसवणूक केली, महागाईने होरपळली सामान्य जनता

ज्यांच्या शिधापत्रिकेवर उज्ज्वला गॅस योजनेचा शिक्का आहे, अशा लाभार्थ्यांना केरोसीन दिले जात नाही.

दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई लक्षात घेता, या महागाईच्या गर्त्यात अडकलेल्या सामान्य नागरिकांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या असताना, दुसरीकडे आता केरोसीनदेखील मिळणे बंद झाले आहे. चिपळूण मध्ये सध्या समान्य गरीब जनतेची पिळवणूक सुरु असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. केरोसीन घेण्यासाठी गॅस नसल्याचे हमीपत्र दिल्याशिवाय केरोसीन दिले जात नाही. आणि आता तर मागील दोन महिन्यांपासून केरोसीन देखील मिळणे बंद झाले आहे. तालुक्याला दर महिन्याला केरोसीनचा पुरवठा ८० हजार लिटर होत असून, तर केरोसीनचा भाव सध्याच्या घडीला ९५ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे.

चिपळूण तालुक्याला दर महिन्याला ८० हजार लिटर इतक्या केरोसीनचा पुरवठा जात होता, परंतु केरोसीनच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या ९५ रुपये प्रतिलिटर इतका केरोसीनचा भाव वधारला आहे. मात्र, आता केरोसीनही बंद केले आहे.

गॅसच्या किमतीत देखील हजारोंच्या घरात पोहोचल्याने, सर्वसामान्य माणसांचे आर्थिक जुळवणूक करताना कंबरडे मोडले आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये विशेषत: गॅसला पर्याय म्हणून केरोसीनचा वापर केला जातो. चिपळूण तालुक्यातील अनेक ठिकाणच्या भागात चूल पेटविणे, स्टोव्ह, दिवाबत्ती यासाठी केरोसीनचा वापर केला जातो,  परंतु शासनाने गॅस जोडण्या देऊन केरोसीन विकत घेण्याचा मार्ग बंद करून टाकला.

घरी गॅस नसल्याचे हमीपत्र सादर केल्याशिवाय केरोसीन देण्यात येत नव्हते. शासनाने जबरदस्तीने गॅस घेण्यास भाग पाडले आणि दुसरीकडे केरोसीन देण्याचा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे जनतेची द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणच्या पुरवठा विभागाच्या किरकोळ केरोसीन परवानेधारकांमार्फत गॅस जोडण्या नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचे वितरण केले जात होते. यासाठी त्यांच्याकडून हमीपत्र भरून याचा पुरवठा केला जात आहे. तर ज्यांच्या शिधापत्रिकेवर उज्ज्वला गॅस योजनेचा शिक्का आहे, अशा लाभार्थ्यांना केरोसीन दिले जात नाही.

शासनाने गाजावाजा करून उज्ज्वला योजना सुरू केली. घराघरांत स्वयंपाकाचा गॅस पोहोचविण्यात आला, परंतु गॅस देताना केरोसीन मिळणार नाही याची तजवीज करून ठेवली. त्यामुळे गॅस घेऊन आम्ही फसलो. आता घरात गॅस असल्याने केरोसीनदेखील दिले जात नाही. शासनाने आमची फसवणूक केली, अशी थेट प्रतिक्रिया ग्रामीण भागातील नागरिकांची उमटली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular