25.1 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना…

क्रीडा क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा...
HomeIndiaहिमाचल प्रदेशमध्ये १६ एप्रिल पासून कडक निर्बंध

हिमाचल प्रदेशमध्ये १६ एप्रिल पासून कडक निर्बंध

कोरोना काळात अनेक ठिकाण निर्बंध लागू करण्यात आले. साधारण वर्षभराच्या निर्बंधांनंतर काही अंशी नियमांमध्ये शिथिलताही आली. भटकंतीचं वेड असणाऱ्या आणि कित्येक दिवस घरातच कोंडलेल्या अनेकांनीच मग वाट धरली ती म्हणजे देशातील पर्यटनस्थळांची. मोठ्या प्रमाणात युवा वर्गानं गिरीस्थानांची निवड करत त्या दिशेनं कूच केली. पण, आता मात्र कोरोनाची दुसरी लाट देशावर धडकलेली असतानाच पर्यटन स्थळांसाठी ओळखल्या राज्यांमध्येही काही पावलं उचलण्यात येत आहे. पर्यटनासाठी पर्यटकांची पहिली पसंती ठरणाऱ्या हिमाचल प्रदेश या राज्यात कोरोना काळातही पर्यटकांवर विशेष कठोर निर्बंध लादण्यात आले नव्हतेत, पण, परिस्थितीचं गांभीर्य जाणत राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी रविवारी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. राज्यात येणाऱ्या पर्यटकांकडे कोविड चाचणीचा निगेटीव्ह अहवाल असणं त्यांनी बंधनकारक असल्याचं सांगितलं.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून हिमाचलच्या दिशेनं येणाऱ्या पर्यटकांकडे 72 तासां दरम्यानचा कोविडच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असणं अपेक्षित असेल. तरच, पर्यटकांना हिमाचलमध्ये प्रवेश करता येणार आहे. 16 एप्रिलनंतर ही नियमावली लागू करण्यात येणार आहे. शिवाय मुख्यमंत्री सातत्यानं राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावाही घेत आहेत. त्यामुळं येत्या दिवसांमध्ये हिमाचलच्या दिशेनं जाण्याचा बेत तुम्ही आखत असल्यास ही बाब जरुर लक्षात घ्या.

पर्यटकांवर बंदी नाहीच.

राज्यात पर्यटकांच्या येण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नसल्याची बाब खुद्द हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केल्यानंतर कोरोना चाचणी अहवालाची अट समोर आली. कोरोना देशभरात अतिशय वेगानं फैलावत असल्यामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊनची नामुष्की ओढावली आहे. पण, हिमाचल प्रदेशात मात्र इतर ठिकाणहून येणाऱ्या पर्यटकांवर कोणत्याही पद्धतीचे निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.

Himachal Pradesh Lockdown

‘पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय राज्याच्या वार्षिक सरासरी उत्पन्नामध्ये 7 टक्क्यांचं योगदान देतात. सहसा इथं पर्यटन स्नेही मोसमात 2 कोटींच्या जवळपास नागरिक भेट देतात. कोविड लॉकडाऊनमुळं येथील व्यवसायांना मोठं नुकसान झालं होतं. आता कुठं पुन्हा एकदा येथील व्यवसायाला चालना मिळली होती. पण, कोरोनाची दुसरी लाट धडकली. असं असलं तरीही तूर्तास पर्यटक आणि पर्यटनावर कोणतीही बंदी नसून आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत’, असं हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले.

नवरात्री काळामध्ये भाविकांना मंदिरांना भेट देता येईल परंतु जे सार्वजनिकरीत्या लंगर, भंडारा तसंच जागरण अशा प्रकारच्या कोणत्याही आयोजनांना बंदी राहील. पर्यटकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक राहील. तसंच बस आणि इतर सार्वजनिक-खासगी वाहनांत क्षमतेहून अधिक लोकांना बसण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. वाहनांतही मास्कचा वापर गरजेचा असेल. जयराम ठाकूर यांनी राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतल्यानंतर ही घोषणा केलीय. राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हिमाचल शासनाने यापूर्वीही २१ एप्रिलपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. राज्यात लग्न समारंभामध्ये ५० पेक्षा अधिक संख्या तसंच मोकळ्या ठिकाणी होणाऱ्या समारंभात २०० हून अधिक जणांना एकत्रित येण्यावर बंदी घातली गेली आहे. अंत्यसंस्कारात केवळ ५० लोक सहभागी होऊ शकतात. कोरोना संक्रणम वेगाने पसरत जाणं हा गंभीर चिंतेचा विषय आहे. राज्यात गेल्या ४५५ दिवसांत १० हजार ६९० करोना संक्रमित रुग्ण आढळले असून, मृत्यू प्रकरणांतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते आहे. गेल्या ४५ दिवसांत राज्यात १२० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular