25.2 C
Ratnagiri
Saturday, January 25, 2025

जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर...

मालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यातील पातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव...

वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

वाशिष्ठो नदीतील गाळ उपसा कामासाठी पुरेसा निधी...
HomeRatnagiriगद्दारांच्या पेकाटात लाथ घालायला आलोय - उद्धव ठाकरे

गद्दारांच्या पेकाटात लाथ घालायला आलोय – उद्धव ठाकरे

गुजरातची चाकरी करणाऱ्या गद्दारांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका.

उद्धव ठाकरे म्हणाले, “उद्योगमंत्र्यांनी किती उद्योग महाराष्ट्रात आणले. त्यांच्यासोबत कोण कोण होते त्याची यादी त्यांनी जाहीर करावी. गुजरातची चाकरी करणाऱ्या गद्दारांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका. आकसापोटी शिवसैनिकांवर कारवाई होत आहे. राजन साळवी, सूरज चव्हाण, किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकर यांच्या घरांमध्ये माणसं पाठवत आहात, ज्यांनी आदेश दिले आणि ज्यांनी कारवाई केली, त्यांची लायकी दाखवल्या शिवाय राहणार नाही.

सत्ता बदल झाला की, त्यांना त्यांची औकात दाखवून देऊ.” पालकमंत्री उदय सामंत यांचे नाव घेता समाचार घेतला. ते म्हणाले, “आज उद्योगमंत्री बसले आहेत. स्वतःचे उद्योग जोरदार सुरू आहेत. उद्योगमंत्री झाल्यावर किती उद्योग महाराष्ट्रात आणले, दावोसच्या खासगी दौऱ्याची खाज का सुटली होती, काही कंपन्या इथल्याच होत्या, इथल्याच लोकांना तिथे नेऊन जाऊन करार केले. या दौऱ्यावर कोण कोण होते, हे आधी जाहीर करा. वेदांता फॉक्स्कॉन, बल्क ड्रगपार्क, फिल्मफेअर गुजरातला गेले.” आपले पंतप्रधान गुजरात विरुद्ध देश, अशी भिंत उभी करत आहेत.

मला गुजराती समाजाविषयी तिरस्कार नाही. राममंदिर बांधलंत चांगली गोष्ट होती. भाजप तेव्हा होती कुठे, विश्व हिंदू परिषदेचे लोकं होते. तुमचं सगळं झालं की, फोटो काढायला आम्ही येतो, असं भाजपचे धोरण होते. महाराष्ट्र बंद करायचा झाला की, शिवसेना रस्त्यावर उतरणार. हे परीटघडीचे कपडे घालून पोलिसांना सांगणार, आलो की आम्हाला आत टाका. तुरुंगात चहाबिस्किट द्या. हे असले लोक आम्हाला हिंदुत्व शिकवणार, मातोश्रीवर मुस्लिम बांधव माझ्याकडे येतात. ते मला सांगतात, तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यातला फरक आम्हाला कळतो, असा दावा ठाकरे यांनी केला.

RELATED ARTICLES

Most Popular