27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriचौपदरीकरण कामादरम्यान माती दगडाच्या हन 'रॉयल्टी' बाबत खनीकर्म विभागाचे दुर्लक्ष

चौपदरीकरण कामादरम्यान माती दगडाच्या हन ‘रॉयल्टी’ बाबत खनीकर्म विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यातील महामार्गाचा बराचसा भाग डोंगराळ असल्याने मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई सुरु आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मोठ्याप्रमाणात दऱ्या डोंगरात सपाटीकरण करण्यात येत असून, यावेळी काढण्यात येणारी माती दगड यांची ‘रॉयल्टी’ बाबत खनीकर्म विभागाला कोणतेही सोयर सुतक नसल्याचे दिसून आले आहे. महामार्ग विभाग जमा करेल तेवढीच रॉयल्टी स्वीकारली जात असून, खनीकर्म विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रशासनाच्या उत्पन्नाला खिळ बसत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम १० टप्प्यात सुरु असून रत्नागिरी जिल्ह्यात यातील चार टप्पे येत आहेत. जिल्ह्यातील महामार्गाचा बराचसा भाग डोंगराळ असल्याने मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई सुरु आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरण करणाऱ्या कंपन्यांनी स्वतःचे हॉटमिक्सरचे प्लॅन्ट लावले आहेत.

रस्त्यासाठी माती उत्खनन केल्यानंतर तीचा वापर त्याच ठिकाणी करणे आवश्यक आहे. परंतु ती अन्यत्र वाहतूक करुन नेली जात आहे. डोंगराच्या दगडींचाही असाच भरावासाठी वापर केला जात आहे. यासाठीची रॉयल्टी संबंधित ठेकेदाराचे बील देताना बांधकाम विभाग काढून घेते. मात्र निश्चित किती रॉयल्टी आहे. याची पाहणी खनीकर्म विभागाकडून होताना दिसत नाही. मागील अनेक वर्षात खनीकर्म विभागाने याची पाहणी केल्याचेही दिसून येत नाही. त्यामुळे खनीकर्म विभाग एक प्रकारे शासनाचे नुकसानच करीत असल्याचे चित्र आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात भोस्ते घाट, परशुराम घाट, कामथे घाट, असुर्डे घाट, निवळी घाट, अंजणारी घाट, वेरळ घाट अशा अनेक घाटांची कामे सुरु आहेत. काही पूर्ण झाली आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणात उत्खननही करण्यात आले. खनीकर्म विभागाने या सर्व कामात दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. यामध्ये ठेकेदाराशी अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular