25.1 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeRatnagiriकारवांचीवाडी परिसरातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

कारवांचीवाडी परिसरातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

नवीन नळ पाणी योजनेचे पाईप जागोजागी फुटत आहेत.

भाजपने निवेदन देऊनही दोन महिन्यांत साळवी स्टॉप ते कारवांचीवाडी परिसरातील अनधिकृत बांधकाम अतिक्रमणावर तहसीलदारांनी कोणतीही कारवाई केली नाही. नळपाणी योजनेचे पाईप वारंवार फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या योजनेचे तांत्रिक व आर्थिक लेखा परीक्षण करण्याच्या मागणीवरही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कार्यवाही केली नाही. त्यामुळे भाजपने ३ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण आणि रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. राज्यात सत्ता असूनही स्थानिक प्रशासन मात्र भाजपाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

कुवारबाव येथे लोकांनी सार्वजनिक कामासाठी तयार केलेले मैदान अनधिकृत ठरवून ते पाडण्याची तत्परता तहसीलदारांनी दाखवली; परंतु महामार्गावरील अनधिकृत बांधकामे तहसीलदारांना दिसत नाहीत का? असा सवालही भाजपने केला आहे. भाजपने अनधिकृत बांधकांमांबाबत तहसीलदारांना निवेदन दिले होते; परंतु दोन महिने होऊनही त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही; परंतु कुवारबावमधील बांधकाम पाडताना तहसीलदार स्वतः उपस्थित होते; मात्र साळवी स्टॉप ते कारवांचीवाडी या मार्गावरील बहुतांश अनधिकृत बांधकामे तशीच आहेत.

फक्त एकाच बांधकामावर कारवाई करण्यात आली, हे अनाकलनीय आहे. त्यामुळे तहसीलदारांविरोधात उपोषण आणि रास्ता रोको करणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. निवेदनाची प्रत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

पाईपलाईन जागोजागी फुटते – नवीन नळ पाणी योजनेचे पाईप जागोजागी फुटत आहेत. याबाबत नागरिकांच्या वतीने भाजपने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन दिले होते. नगर पालिकेनेही या योजनेत अनियमितता आढळून आल्याचे सांगितले आहे. जीवन प्राधिकरण ही एक तांत्रिक तज्ज्ञ संस्था असूनही भाजपच्या मागणीनुसार आर्थिक व तांत्रिक लेखापरीक्षण केले गेले नाही. ही मागणी गांभीर्याने न घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण व रास्ता रोको करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular