28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...

तटरक्षक दलाचा टिळक रुग्णालयाबरोबर करार

भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित...

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...
HomeRatnagiriअखेर रामदास कदमांची घुसमट बाहेर, शिवसैनिकांना कळले पाहिजे गद्दार कोण !

अखेर रामदास कदमांची घुसमट बाहेर, शिवसैनिकांना कळले पाहिजे गद्दार कोण !

शिवसेनेचे अंतर्गत वाद आत्ता चव्हाट्यावर यायला लागले आहेत. रामदास कदम यांच्या कथित ऑडीयो प्रकरणामुळे अनेक वादंग निर्माण झाले. तेंव्हापासून पक्षश्रेष्ठींनी कदमंकडे पाठ फिरवल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे इतके गप्प असलेले रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

“माझ्याविरोधात माध्यमांमधून उलट सुलट बातम्या दाखवण्यात आल्या. मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करण्यात आले आहे आणि ते किती चुकीचे आहे हे समोर आल्यानंतरसग मी माझी बाजू मांडण्यासाठी हि प्रेस कॉन्फरंस घेतली आहे. जी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती त्यामध्ये मी शिवसेना पक्षाच्या बाबतीत काहीही बोललेलो नाही. मी आमचे श्रद्धास्थान बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की, मी किरीट सोमय्या यांच्यासोबत कसलेही संभाषण कधीही केलेले नाही. त्यांच्यासोबत कोणत्याही विषयावर चर्चा केलेली नाही.

मी अनेक वर्षे अनेक पदांवर कार्यान्वित आहे, त्यामुळे  पक्षाला हानी पोहचेल अशी कुठलीही गोष्ट माझ्याकडून घडणार नाही. मी उद्धव ठाकरेंना पत्र देऊन त्याबाबत लेखी खुलासा केला होता. एकाच पक्षातील दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून मी इतके दिवस मी गप्प राहलो असल्याचे   पत्रामध्ये मी स्पष्टपणे सगळे नमूद केले आहे,” असे रामदास कदम म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी रत्नागिरीचे पालकमंत्र अनिल परब यांच्यावर घणाघाती शाब्दिक हमला चढवला आहे. ते म्हणाले कि, परब जरी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी, मी ठामपणे सांगतो कि, ते फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जिल्ह्यामध्ये येत असतील. बाकी सपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडून दिला आहे. अनिल परबांचा जिल्ह्यासोबत कुठलाही संपर्क नाही. तालुका प्रमुखाचे नावही त्यांना माहिती नाही.

यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. मिलींद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत असल्याने पाडण्यात आला. परब यांनी स्वतःचे हॉटेल बांधायचे आणि मग ते पाडण्यात आले की मग शिवसेनेच्या एका नेत्याला टारगेट करून कायमचे उद्धवस्त करण्याचे काम करायचे. यांच्या खाजगी मालमत्तेचा शिवसेने सोबत संबंधच काय?

दसरा मेळाव्यामध्ये माझ्या विरोधात ज्या गद्दारी सारख्या घोषणा दिल्या गेल्या, त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. मी आयुष्यभर केवळ शिवसेनेसाठीच संघर्ष केलेला मावळा आहे आणि मी अजूनही एकनिष्ठ आहे. असे असताना फक्त अनिल परब यांच्या रिसॉर्ट विरोधात बोलल्यामुळे माझ्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या. याच्या पाठी कोण कोण कार्यरत आहेत, हे मला सगळे माहित आहे,” असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे. स्थानिक आमदारांना डावलून सातत्याने कायमच आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे. शिवसेना राष्ट्रवादीकडे गहाण ठेवणारे अनिल परब गद्दार की कडवे शिवसैनिक असलेले रामदास कदम गद्दार?  असा थेट सवाल रामदास कदम यांनी केला.

RELATED ARTICLES

Most Popular