21.9 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये कॅशिअरनेच लावला बँकेला चुना

रत्नागिरीमध्ये कॅशिअरनेच लावला बँकेला चुना

सावधान! आता मनोरंजन बँकेच्या नोटा चलनात येण्याची भिती आहे. रत्नागिरीतच हा ‘प्रकार समोर आला. चक्क बँकेच्या कॅशिअरनेच बँकेत मनोरंजन बँकेच्या नोटा ठेवून तब्बल १ लाख ६१ हजार ५०० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या कॅशिअरविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोट्या नोटा चलनात आणून फसवणूक होते असे ऐकिवात होते. आता मात्र नव्या बँकेच्या नोटा आणून वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे बँकेतील अधिकारी, कर्मचारी चांगलेच हडबडले असून हा पराक्रम करणाऱ्या कॅशिअरविरोधात त्यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरीतील डीएनएस बँकेत कॅशिअर पदावर कामावर असणारा संशयित अक्षय चंद्रकांत वेशवीकर याने नोव्हेंबर २०२२ ते ८ जून २०२३ या कालावधीत डीएनएस बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

कॅश काऊंटरवर असलेल्या ५०० रूपयांच्या नोटांची बंडले स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यासाठी नेली. मात्र तेथे लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा ठेवून त्याने बँकेची १ लाख ६१ हजार ५०० रूपयांची फसवणूक केली आहे, असा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी बँक व्यवस्थापकाने शहर पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बँक कॅशिअर असलेल्या अक्षय चंद्रकांत वेशवीकर याच्याविरोधात भा.दं.वि.क. ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular