21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeRatnagiriरुग्णवाहिका कंत्राटी चालकांचे वेतन वाढवा - 'सीईओं'ना निवेदन

रुग्णवाहिका कंत्राटी चालकांचे वेतन वाढवा – ‘सीईओं’ना निवेदन

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी एक रुग्णवाहिका देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकांवर कार्यरत कंत्राटी वाहनचालकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे, अशी मागणी ६७ वाहनचालकांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि रत्न- सिंधु योजनेचे सदस्य भैय्या सामंत यांच्याकडे केली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी एक रुग्णवाहिका देण्यात आली आहे. त्यावर वाहनचालकांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात आली आहे. हे कंत्राट देण्यासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते.

सध्या त्या वाहनचालकांना ११ हजार ३०० रुपये मासिक वेतन दिले जाते. कामाचा भार पाहता चालकांवर हा अन्याय आहे. अनेकवेळा रात्रीअपरात्री रुग्णांना घेऊन तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी या चालकांना रुग्णवाहिका घेऊन यावे लागते. चोवीस तास सतर्क राहवे लागत असल्यामुळे चालकांनाही मोठा त्रास होतो. याकडे जिल्हा परिषद प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करते. गेली वीस वर्षे मिळेल त्या मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी वाहनचालकांकडे कुणीतरी लक्ष द्या अशी साद घालण्यासाठी ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिका घेऊन चालक जिल्हा परिषदेत आले होते.

हा प्रश्न पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मांडण्यासाठी त्यांचे बंधू भैय्या सामंत यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला. कंत्राटी कामगारांच्या पुढील वर्षाच्या नियुक्तीसाठी निविदा काढली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये प्रति वाहनचालक १५ हजार रुपयांची निविदा भरण्यात आली तर पुन्हा मासिक वेतन ११ हजार ३०० रुपयेच मिळेल. निविदेच्या रकमेत वाढ झाली तरच चालकांचे मानधन वाढेल. मासिक १९ हजार ३०० रुपये इतके मिळावे अशी मागणी वाहनचालकांनी आज अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन सीईओ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वाहनचालकांना दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular