24.9 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraअवघ्या ३४ सेकंदात उत्तरकाशीमध्ये होत्याचं नव्हतं

अवघ्या ३४ सेकंदात उत्तरकाशीमध्ये होत्याचं नव्हतं

३० जणांचा मृत्यू ओढवला असून शेकडो लोकं बेपत्ता आहेत.

उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाली असून अवघ्या ३४ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं आहे. अचानक पाण्याचा लोंढा आला आणि अख्खं धराली गाव त्याने जणूकाही गिळंकृत केले. या जलप्रलयात शेकडो लोकं प्राणाला मुकली असल्याची भीती व्यक्त होत आहे. सायंकाळी उशीरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, किमान ३० जणांचा मृत्यू ओढवला असून शेकडो लोकं बेपत्ता आहेत. घरादारांसह शेकडो लोकं पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली. दुकानं, हॉटेल वाहून गेली असून लष्करानं बचावकार्य हाती घेतलं आहे. उत्तर काशीच्या धराली गावात ढगफुटी झाली. धराली येथील खीर गंगेच्या पुरात अनेक घरे वाहून गेली असून बचाव कार्य सुरू आहे. ढगफुटीनंतर पाण्याचा मोठा प्रवाह धराली गावातील बाजारपेठेत आला ज्यामुळे मोठा हाहाकार उडाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माणसांसह घरे वाहून गेली – उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहात डझनभर घरे वाहून गेली आहेत. स्थानिक प्रशासन बचावकार्यासाठी रवाना झाले आहे. ही घटना बारकोटजवळ घडली. ढगफुटीमुळे डोंगराचा मोठा भाग पाण्यासह खाली आणि गावात घुसला. धराली खीर गड येथे पाण्याची पातळी वाढल्याने धराली बाजाराच मोठं नुकसान झालं. गंगोत्री धामचा मुख्य थांबा असलेल्या धराली येथील खीर गंगा नदीत ढगफुटी झाल्याने प्रचंड नुकसान झाले. विनाशकारी पुरामुळे सुमारे २० हॉटेल्स आणि होमस्टेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक स्थानिक लोक आणि कामगार गाडले गेल्याची शक्यता आहे.

सैन्याचे मदतकार्य सुरू – उत्तरकाशीमध्ये, हर्षिल परिसरातील खीर गडच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि धरालीम ध्ये झालेल्या नुकसानीमुळे पोलिस, एसडीआरएफ, सैन्य आणि इतर आपत्ती प्रतिसाद पथके घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात सहभागी झाली आहेत. त्यामुळे प्रत्येकाने नदीपासून योग्य अंतर राखले पाहिजे. स्वतःला, मुलांना आणि गुरांना नदीपासून योग्य अंतरावर घेऊन जा, अशी माहिती उत्तराखंड पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular