26.2 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeRatnagiriरत्नागिरीप्रमाणे राजापूर-लांजाचा जोमाने विकास केला जाईल - पालकमंत्री सामंत

रत्नागिरीप्रमाणे राजापूर-लांजाचा जोमाने विकास केला जाईल – पालकमंत्री सामंत

गेल्या दहा वर्षात राजापूरचा विकास होऊ शकलेला नाही. याला कारण संकुचित मानसिकता दिसलेली आहे. त्यामुळे आम्ही राजापूर- लांजाकडे विशेष लक्ष पुरविले आहे. मानसिकता असेल तर काम उभं राहू शकते. याचे उदाहरण म्हणजे राजापूर शहरवासियांसाठी होत असलेली ही विस्तारित नळपाणी पुरवठा योजना आणि नव्या धरणाचे काम आहे. या योजनेच्या राजापूरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल तर पुढील वर्षी रत्नागिरीप्रमाणे राजापूरात कॅशलेस हॉस्पीटल उभारले जाईल अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी येथे केली. भविष्यात रत्नागिरीप्रमाणे राजापूर- लांजाचा जोमाने विकास केला जाईल अशी नवी घोषणा ना. सामंत यांनी केली.

खोटं बोला पण रेटून बोला आणि बॅनरबाजी करून फुकटचे श्रेय घेण्याचा महाराष्ट्रात जर नंबर काढायचा असेल तर त्यात राजापूरच्या लोकप्रतिनिधीचा नंबर येईल अशी खरमरीत टीका करतानाच खोटी बॅनरबाजी करून श्रेय मिळत नाही तर त्याठी फिल्डवर उतरून काम करावे लागते तर जनता तुम्हाला आपलं मानते असा टोलाही नाम. सामंत यांनी लगावला. राजापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे तसेच कोदवली येथील नवीन धरणाच्या उर्वरित कामाचे भूमीपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून झाले. तर माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे आणि माजी नगराध्यक्ष हनिफ काझी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते भूमीपूजन करून झाले.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसच्या माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफ, सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, माजी नगराध्यक्ष अड. जमीर खलिफे, हनिफ काझी, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दिपक नागले, शहर प्रमुख सौरभ खडपे, प्रांताधिकारी डॉ. जस्मीन, नगर पालिका प्रशासन उपआयुक्त तुषार बाबर, तहसिलदार विकास गंबरे, मुख्याधिकारी चेतन विसपुते, अर्बन बँक उपाध्यक्ष विवेक गादीकर, संचालक संजय ओगले, म हिला आघाडी तालुकाप्रमुख सौ. डबरे, हर्षदा खानविलकर, न. प. चे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular