आमदार भास्कर जाधव आणि आमदार निलेश राणे यांच्यातील वाद काय नवा नाही. चिपळूण येथील दोन्ही समर्थकांत झालेला मागचा राडा अजून कोणी विसरले नाहीत. त्यावेळी पोलिसांनी अश्रूधूर आणि लाठीमार केला होता. नंतर निलेश राणे यांनी घेतलेली सभा चर्चेत आली होती. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता कुडाळचे आमदार निलेश राणे हे विधान सभेत निवडून आल्याने जेव्हा दोघे आमने सामने येतात तेव्हा दोघांची चांगलीच ठसन होते. तेव्हा अनेकांनी पाहिले आहे. यांच्यात म्हणे इस्तव जात नाही. आम राणे या नेत्यांला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश देऊन अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेसमोरही तगडं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. मागच्या आठवड्यातही आमदार भास्कर जाधव हे एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर टीका करताना आमदार निलेश राणे यांनी हस्तक्षेप करीत वेल मध्ये उतरले, तेव्हा दोघांत बाचाबाची झाली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनात आज लक्षवेधी सूचना मांडण्याच्या कामाच्या वेळेवरून विरोधक आणि सत्ताधारी भिडले. सभागृहाच मुळ कामकाज होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.
आमदार जयंत पाटील बोलत होते. एका दिवसात चार लक्षवेधी सूचना झाल्या पाहिजेत तर आज ३५ लक्षवेधी सूचना आहेत असं सांगत आम. भास्कर जाधव हेही लक्षवेधी सूचना बाजूला सारून सहत्वाचे काम घ्या. वेळ कमी आहे असं सांगत तालिका अध्यक्षांकडे मागणी करू लागले. त्यावेळी एक ज्येष्ठ नेते म्हणून तालिका अध्यक्षांनी जाधव यांना अधिक बोलण्याची संधी दिली. आम. भास्कर जाधव यांना इतर कामकाज बाजूला सारून करीत असलेली मागणी आणि अध्यक्षांनी बोलायची संधी दिल्याने समोर सत्ताधारी बाकावर बसलेले आमदार निलेश राणे यांना रुचली नाही. अध्यक्ष मलाही बोलायला दिल पाहिजे. जे पटलावर काम आहे ते घ्या अशी जोरदार मागणी निलेश राणे करू लागले. आणि इथेच ठिणगी पडली. आणि दोघांत जोरदार बाचाबाची झाली. एका बाजूला एकटे निलेश राणे आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे सेनेचे आमदार एकमेकांवर तुटून पडले. यावेळी सभागृहात भास्कर जाधव आणि निलेश राणे यांनी एकमेकांना बोलताना अरेतुरेची भाषा वापरली. तेव्हा सारेच अवाक झाले.
भास्कर जाधव यांच्या बाजूने आदित्य ठाकरे यांच्यासहित सर्वच आमदार उभे राहिले तर निलेश राणे यांच्या सोबत आम दिलीप लांडे उभे राहिले. आणि ऐन होळीत विधान सभेत कोकणातील राजकीय शिमगा विधान सभेत पहायला मिळाला. त्यावेळी वातावरण तापले. त्यानंतर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी उभे राहून दोघांचे नाव घेऊन शांत रहा, शांत रहा. मी अध्यक्ष उभा असताना आपल्याला बसावे लागेल असं म्हणत दोघांना विधिमंडळाचा नियम दाखविला. पण दोघेही ईर्षेला पेटले. प्रकरण हाता बाहेर जाणार हे लक्षात घेता पीठासन अधिकारी योगेश सागर यांनी परिस्थती चांगलीच नियंत्रणाखाली आणली. नंतर वातावरण शांत झाले. पण दोघांमध्ये झालेला संवाद असंसदीय असल्याने तो भाग कामकाजातून काढून टाकण्यात आला.