26.9 C
Ratnagiri
Wednesday, October 30, 2024
HomeChiplunजगबुडी पुलाच्या भगदाडासह संपूर्ण गर्डरला भेग, अजूनही काम सुरुच

जगबुडी पुलाच्या भगदाडासह संपूर्ण गर्डरला भेग, अजूनही काम सुरुच

हे दुरुस्तीचे काम नक्की सुरु आहे की केवळ दिखाऊपणा आहे, हेच जनतेला कळतं नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील नवीन पुलाच्या गर्डरला वाहतुकीमुळे भगदाड पडले आहे. त्यामुळे गोवा ते मुंबई जाणाऱ्या एक मार्गिकेचा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. यांच पुलाच्या भगदाडासोबत संपूर्ण गर्डरला भेग पडली असून दिवस रात्र या पुलाच्या गर्डर दुरुस्त करण्यासाठी तोडफोडीचे काम चालू आहे. ही दुरुस्ती कधी पूर्ण होईल, हे सांगणे कठीण झाले आहे. केवळ पुलावर ताडपत्रीची शेड उभारुन काम चालू असल्याचे दाखवले जात आहे. प्रत्यक्षात दिवसा आणि रात्री एक दोन तास तोडफोड केली जाते.

हे दुरुस्तीचे काम नक्की सुरु आहे की केवळ दिखाऊपणा आहे, हेच जनतेला कळतं नाही, अशी ओरड वाहनचालक नागरिक करत आहेत. आठवडाभरापूर्वी रविवारी, संध्याकाळच्या सुमारास हा गंभीर प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते रुपेश सुरेश पवार यांच्या लक्षात आला होता. त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभाग केटीआयएल कंपनी व महत्वाची रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवणारी ब्ल्यूम कंपनी यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली होती. मात्र, सगळ्यांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केले, रविवारी सायंकाळी या पुलाचा गर्डर जोरदारपणे वर खाली होत असल्याने थेट खेड पोलिस ठाण्यात फोनं केला होता.

पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी स्वतः जातीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर केटीआयएलच्या मदतीने. पोलिस खात्यात थेट नवीन पुलावरची वाहतूक बंद केली होती. या “गंभीर प्रकाराने सर्वत्र एकच खळबळ उडाली. सोमवारी, सकाळी राष्ट्रीय महामार्ग विभाग, ठेकेदार केटीआयएल आणि ब्ल्यूम कंपनी यांनी संयुक्तपणे पुलाच्या खड्धासह भेग पडलेल्या ठिकाणची पाहणी केली, रुपेश पवार यांनी केलेल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर, हा गंभीर प्रकार पुढे उद्भवला नसता. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तज्ञ आणि वरिष्ठ यांचे म ार्गदर्शन घेऊन पुलाच्या गर्डर दुरुस्ती कामाला सुरुवात केली.

RELATED ARTICLES

Most Popular