दि. २६ ऑक्टोबर पासून जयगड बंदरामधील एक मच्छिमार नौका लापता आहे, सदर मच्छीमार नौकेवर गुहागर तालुक्यातील सहा ते आठ खलाशी कार्यरत होते. या मच्छीमार नौकेला योग्य ठिकाणी मासेमारी करत असताना ठरवून दिलेल्या चॅनेलच्या बाहेर जयगड बंदरामध्ये येणारी एक मोठी बोट धडकली. मोठ्या बोटीने त्यांचा चॅनेल सोडून त्या बाहेर येऊन मच्छिमार बोटीला धडक दिल्यामुळे मच्छिमार बोट बुडाली व या बोटीवरील खलाशांचा मृत्यू झाला आहे व सहा ते सात खलाशी बेपत्ता आहेत. याबाबत सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील बेपत्ता मच्छीमारी नौकेचा शोध अजूनही लागलेला नसून तो सुरूच ठेवण्यात आला आहे. खासगी कंपनीच्या मालवाहतूक जहाजाने धडक दिल्याने नवेद २ नौका बुडाल्याचा मच्छीमार्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. या प्रकरणी योग्य तो निर्णय झाला नाही तर समुद्रात चक्का जाम आंदोलन करू, असा आक्रमक पवित्रा मच्छीमारांनी घेतला आहे. संदर्भात शुक्रवारी साखरीआगार येथील एका मंदिरात बैठक झाली.
पोलिसांचा तपास तेंव्हापासूनच सुरू असला तरी अजून प्रशासना किंवा खासगी कंपनीकडून कोणतेच पाऊल उचलण्यात आलेली असल्याने, स्थानिक मच्छीमार आक्रमक झाले आहेत. ती मच्छीमारी नौका गायब कशी काय होऊ शकते? याबाबत सखोल तपास करण्याची मागणी केली जात आहे. गुहागर तालुक्यातील पालशेत, साखरीआगार, रत्नागिरी तालुक्यातील जयगड, वरवडेसह आजूबाजूच्या परिसरातील सुमारे दोनशेहून अधिक मच्छीमार या प्रकरणी एकवटले आहेत. तेंव्हा नवेद बोटीचे मालक नासीर हुसेनमियाँ संसारे यांच्यासह मच्छीमार सोसायटीचे काही पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती.
मच्छीमारी नौकेवर चार खलाशी आणि दोन तांडेल होते. एकाचा मृतदेह सापडला असून सोबत बेपत्ता नौकेवरील मच्छी साठवण्याचा टब देखील मिळाला आहे, बाकी तिघांचा अजून काहीच माहिती मिळाली नाही आहे. त्यामुळे भविष्यामध्ये असे होणारे अपघातावर रोख लावण्यासाठी गुहागर, जयगड येथील मच्छीमार मालवाहू नौका जाणाऱ्या चॅनेलवर मच्छीमारी नौका ठेवून समुद्रात चक्का जाम करण्याची तयारी केली आहे.