28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeEntertainmentपराग अग्रवाल ट्वीटरचे नवीन सीईओ, कंगनाचे स्पेशल ट्वीट

पराग अग्रवाल ट्वीटरचे नवीन सीईओ, कंगनाचे स्पेशल ट्वीट

अनेक भारतीय वंशाचे नागरिक व्यावसायिक जगतात कार्यरत आहेत,  जे आपल्या उत्कृष्ट कामगिरीने जगात आपले नाव कमावत आहेत. मग ते गुगलचे सीईओ सुंदर पिचाई किंवा नुकतेच ट्विटरच्या सीईओ पदी नियुक्त झालेले पराग अग्रवाल असो. जॅक डोर्सीच्या राजीनाम्यानंतर नुकतेच पराग अग्रवाल यांना ट्विटरचे सीईओ बनवण्यात आले आहे,  ज्यावर अभिनेत्री कंगना राणावतने एक वेगळीच प्रतिक्रिया देत जॅक डोर्सीची एक प्रकारे खिल्ली उडवली आहे.

कंगना आणि ट्विटरमधील युद्ध सर्वज्ञातच आहे, हे कोणापासूनही लपून राहिलेले नाही. कंगनाचे ट्विटर अकाउंट जॅक डोर्सीच्या नेतृत्वाखाली कायमचे सस्पेंड करण्यात आले होते. यावर कंगनाने ट्विटर आणि जॅकबद्दल बरेच बरळली होती. आता जॅकच्या राजीनाम्या नंतर कंगनाने ट्विटरची कमान एका भारतीयाच्या हाती आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर, जॅक डोर्सीच्या राजीनाम्याने कंगनाला झालेला आनंद तिच्या पोस्टवरून दिसून येत आहे.

कंगना राणावतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक ट्विट शेअर केले आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘ट्विटर सीईओ पराग अग्रवाल, जे आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी आहेत, सीईओ म्हणून जॅक डोर्सीची जागा घेत आहेत.’ हे शेअर करताना कंगनाने जॅक डोर्सीला ‘जॅक अंकल’ असे संबोधून त्यांना निरोप दिला आहे.

जॅक डोर्सी यांनी सोमवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सीईओ पदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी जारी केलेल्या निवेदनात डॉर्सी म्हणाले की, ट्विटरबोट १६ वर्षांच्या सहवासानंतर आता अखेर पायउतार होण्याची वेळ आली आहे. त्यांनी पुढे जाहीर केले की, पुढे कंपनीचे नेतृत्व ४५ वर्षीय भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे सीईओ पदावर राहून काम पाहतील.

RELATED ARTICLES

Most Popular