25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeRatnagiriपोस्टातील कर्मचाऱ्यांचा असाही कार्यतत्परपणा

पोस्टातील कर्मचाऱ्यांचा असाही कार्यतत्परपणा

दाखल झालेल्या रुग्णांपैकी ४-५ लोकांकडे स्वतःचे बँक किंवा पोस्ट असे कोणतेच खाते नसल्याने त्यांना मानधना पासून वंचित राहावे लागणार होते.

अपरान्त हॉस्पिटलच्या सहकार्यातून प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे येथे दिनांक ०३/८/२०२२ रोजी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कापरे आणि खरवते आरोग्य केंद्रांतर्गत गावातील रुग्ण शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी दाखल झाले होते. अशा शिबिरात शस्त्रक्रिया करून घेतलेल्या रुग्णांना शासना कडून मानधन स्वरुपात काही रक्कम दिली जाते, हे मानधन त्या त्या रुग्णाच्या बँक खात्यामधे जमा केले जाते. ग्रामीण भागामध्ये अनेकांची बँक अथवा पोस्टांमध्ये खातेच नसल्याने आयत्या वेळी अडचणी निर्माण झाल्या.

परंतु दाखल झालेल्या रुग्णांपैकी ४-५ लोकांकडे स्वतःचे बँक किंवा पोस्ट असे कोणतेच खाते नसल्याने त्यांना मानधना पासून वंचित राहावे लागणार होते. याची कल्पना ज्या आरोग्य कर्मचारी यांनी रुग्णांना शस्त्रक्रिया करून घेण्यास प्रवृत्त केले होते त्यांनी आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर याना त्यांची अडचण सांगितली. त्यांनी त्यांचे मित्र कापरे गावचे पोस्टमन श्री. संदीप पवार यांना फोन लावला आणि त्यांना सदर बाब सांगितली व सदर रुग्णांची पोस्ट बँकेची खाती काढून देण्याची विनंती केली.

त्यांनी ही सदर बाब पोस्ट मास्टर याना सांगून कापरे चे पोस्ट मास्टर श्री. सौरभ मुर्बाळे याना घेऊन पुढच्या १० ते १५ मिनिटात आरोग्य केंद्रात येऊन तत्काळ खाती काढून दिली आणि रुग्णांना एक प्रकारे दिलासा मिळाला. आरोग्य सहाय्यक श्री. निवेंडकर  यांनी पोस्टमास्तर श्री.सौरभ  मुर्बाले आणि पोस्टमन श्री. संदीप पवार यांनी तातडीने येऊन सदरची खाती काढून दिली त्या बद्दल आरोग्य केंद्राचे वतीने  दोघांचे ही आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular