तालुक्यातील करबुडे गावच्या विकासकामासाठी जराही निधी कमी पडू देणार नाही. महिनाभरात आणखी एक कोटीचा निधी जिल्हा नियोजनमधून दिला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. करबुडे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आले. पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘करबुडे गावच्या विकासासाठी मागाल ती कामे मंजूर केली जातील. एकही काम मागे ठेवणार नाही.
आपण विकासाचा आराखडा तयार करा. महिनाभरात आणखी १ कोटीचा निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले. सरपंच संस्कृती पाचकुडे यांनी सर्वांचे आभार मानले. गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबू म्हाप, प्रवीण पांचाळ, शंकर सोनवणकर, मिलिंद खानविलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.