26.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriकासारवेलीतील तरुणावर धारदार चाकूने वार, गुन्हा दाखल

कासारवेलीतील तरुणावर धारदार चाकूने वार, गुन्हा दाखल

हल्ल्यात जखमी तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून जीवघेणा हल्ला करणारा संशयित आरोपी देखील तेथीलच आहे.

रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली गावातील पारवाडी येथे तरुणावर धारदार चाकूने वार केल्याने खळबळ उडाली आहे. हल्ल्यात जखमी तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून जीवघेणा हल्ला करणारा संशयित आरोपी देखील तेथीलच रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सोमवारी सायंकाळी मनोहर डोर्लेकर हे नेहमीप्रमाणे कासारवेली पारवाडी येथे आपल्या सहकाऱ्यां समवेत गप्पा मारत बसले होते. तेथे अचानक उमेश वासावे हा तरुण हातात धारदार सुरा घेऊन त्यांच्या दिशेने धावत आला आणि कुणाला काही कळण्याआधीच त्याने मनोहर डोर्लेकर यांच्या मानेवर, हातावर सुऱ्याने सपासप वार केले आणि त्याला जखमी करून तो घटनास्थळावरून पळून गेला. अचानक झालेल्या या हल्ल्यात रक्तबंबाळ अवस्थेत असलेले मनोहर डोर्लेकर हे कासारवेली येथून साखरतरपर्यत चालत आले.

त्यानंतर एका रिक्षा व्यवसायिकाने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनित चौधरी हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या विशेष पथकाने हल्ला करणाऱ्या उमेशचा रात्रभर शोध घेतला. त्याला रात्री उशिरा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

उमेश वासावे याने मनोहर डोर्लेकर यांच्यावर नेमका हल्ला का केला? हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. याप्रकरणी पोलीस स्थानकात उमेश वासावे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. उमेश वासावे याच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दारूच्या नशेत असलेला उमेश ग्रामस्थांवर हल्ले करतो. गेली चार ते पाच वर्ष तो शांत होता, परंतु पुन्हा त्याने गुन्हेगारी कारवाया सुरू केल्याने परिसरात त्याची दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular