प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हा एक टर्निंग पॉइंट असतो. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे ९ डिसेंबर रोजी सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा लग्न झाले. हे या वर्षातील सर्वात मोठे लग्न होते, ज्याची चर्चा सर्वत्र होत होती. या लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे प्रायव्हसी. लग्नामध्ये काय काय घडले याबाबत काहींही अतापता मिडीया अथवा बाहेरील कोणत्याच व्यक्तीला झाला नाही.
दिल्ली आणि यूपी पोलिसांचा लोकांना अशा प्रकारे सुरक्षा राखण्याचा संदेश देण्याचा सॉलिड फंडा जनतेच्या पसंतीस आला आहे. दिल्ली पोलिसांनी विकी-कतरिनाच्या लग्नाचे उदाहरण देत लोकांना ऑनलाईन सुरक्षेसाठी पासवर्ड कसा सुरक्षित ठेवला जातो, याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, लोकांनी त्यांचा पासवर्ड #VicKat च्या लग्नासारखा सुरक्षित ठेवावा.
दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसाठी असे उदाहरण देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी लोकांना अशी अनेक प्रसिद्ध उदाहरणे देऊन सावध केले आहे. यूपी पोलिसांनी देखील लोकांना लग्नासाठी सायबर सेफ्टीबाबत सूचना देताना विकी-कतरिनाच्या लग्नाचा हवाला दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, सायबर गुन्हेगारांपासून दूर राहण्यासाठी विकी-कतरिनाप्रमाणे ऑनलाइन सुरक्षितता बाळगा. दिल्ली आणि यूपी पोलिसांचे हे सॉलिड ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. पोलिसांचा देण्याचा संदेश जनतेमध्ये पोहोचण्यासाठी त्यांनी अशी विनोदी पद्धत वापरली असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या विवाहबंधनाचे फोटो कुठेही लिक झाले नसल्याने, दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत होते. रात्री ८.३० च्या सुमारास विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांसाठी लग्नाचे फोटो शेअर केले. आणि सोबत विकीने एक नोटही लिहिली कि, आमच्या हृदयातील एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर आज आम्हाला इथवर घेऊन आले आहे. आमच्या भावी नवीन आयुष्यासाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.