22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraमहाराष्ट्र वाचविण्यासाठी सर्वपक्षीयांसह तरुणांनी पुढे येण्याची गरज

महाराष्ट्र वाचविण्यासाठी सर्वपक्षीयांसह तरुणांनी पुढे येण्याची गरज

महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी सुरू असलेले कर्नाटक सरकारचे षड्यंत्र आता हाणून पाडायचे आहे.

महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नाविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या जाहीर निषेधाचा ठराव साळगावकर यांनी मांडला. तर राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांबाबत कोणतीही दखल न घेणाऱ्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या निषेधाचा ठराव कोरगावकर यांनी मांडला. तसेच महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी सुरू असलेले कर्नाटक सरकारचे षड्यंत्र आता हाणून पाडायचे आहे. त्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करून त्यांना पुढे आणा, असे आवाहन आज येथे झालेल्या सर्वपक्षीयांच्या विचार विनिमय बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केले.

केसरकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादासंदर्भात आतापर्यंत शेकडो हुतात्मे झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांचा हा लढा आहे. आता कर्नाटकातील सरकार सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट यावर आपला दावा सांगत आहे. तसे वक्तव्य कर्नाटक नेत्यांकडून होत आहे. हा सर्व प्रकार म्हणजे मराठी माणसाची गळचेपी आणि महाराष्ट्राचे लचके तोडण्यासारखाच आहे; मात्र सत्तेसाठी लाचार झालेले राज्यातील नेते त्यावर कोणतीही भूमिका घेत नाहीत, हे दुर्दैव आहे.’’

या सर्व गैर प्रकाराला केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्रातील नेते थोर पुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, उमाकांत वारंग, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे,  सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर,  रवी जाधव, अमोल सारंग आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत नेमण्यात आलेल्या राज्यस्तरीय कमिटीत ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांना सामावून घ्यावे, असाही ठराव एकमताने घेण्यात आला.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सिंधुदुर्गात तालुकास्तरीय कमिट्या स्थापन कराव्यात, यासाठी अध्यक्ष केसरकर यांनी पुढाकार घ्यावा, असा ठराव रवी जाधव यांनी मांडला. या सर्व ठरावांना उपस्थितांनी एकमताने अनुमोदन दिले. महाराष्ट्र वाचविण्यासाठी सर्वपक्षीयांसह तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. त्या दृष्टीने बैठकीस उपस्थित सर्वांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा सुरू असलेला प्रयत्न सर्वांनी तरुणांसमोर प्रकर्षाने मांडावा आणि या लढ्यात त्यांना सामावून घ्यावे, असे आवाहन केसरकर यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular