31.2 C
Ratnagiri
Thursday, March 28, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeKhedखेडमध्ये पिंप कापताना स्फोट झाल्याने, भंगार व्यवसायिक जागीच ठार

खेडमध्ये पिंप कापताना स्फोट झाल्याने, भंगार व्यवसायिक जागीच ठार

या दुर्घटनेमुळे शहरातील मानवी वस्तीत असणाऱ्या भंगार व्यावसायिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

खेड शहरतातील महाडनाका परिसरात छोटू सोनक नामक भंगार व्यावसायिकाचे भंगाराचे दुकान आहे. भर मानवी वस्तीत असलेल्या या दुकानात मोठे केमिकलचे पिंप रचून ठेवलेले असतात. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास याच पिंपातील एक पिंपाचे झाकण गॅस कटरच्या साहाय्याने कापण्याचे काम भंगार व्यावसायिक छोटू सोनकर हा करत असताना अचानक रासायनिक प्रक्रिया झाली आणि त्या पिंपाचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटात तो व्यावसायिक गंभीररित्या भाजल्याने जखमी झाला.

गॅस कटरच्या साहाय्याने केमिकलचा पिंप कापत असताना रासायनिक प्रक्रिया होऊन अचानक झालेल्या स्फोटात गंभीर भाजलेल्या भंगार व्यावसायिकाचा दुर्दैवी अंत झाला. ही दुर्घटना खेड शहरातील महाड नाका परिसरात घडली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे शहरातील मानवी वस्तीत असणाऱ्या भंगार व्यावसायिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुकानात काम करण्याऱ्या अन्य कामगारांनी त्याला तात्काळ खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन करुन पुढील तंत्रिक प्रक्रिया करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. खेड पोलीस ठाण्यात याची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

खेड शहर आणि परिसरात भंगार व्यवसायाची अनेक दुकाने आहेत. गेली अनेक वर्ष भंगारचा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरु आहे. पार्क केलेल्या वाहनांच्या चोरीस गेलेल्या बॅटऱ्या देखील भंगार व्यावसायिकाकडे आढळून येत असतात. मात्र, भंगार व्यवसायिकांना याबाबत जाब विचारणारा कोणी नाही. ही दुर्घटना घडली ते दुकानही भर नागरी वस्तीत आहे. या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेची झळ परिसरातील नागरिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे अवैध भंगार व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एखादा ठिकाणाहून चोरी झालेल्या माल या दुकानांमध्ये आढळून आलेला आहे. मात्र, चोरीचा माल खरेदी करण्याऱ्या भंगार व्यावसायिकांवर पोलीस काहीच कारवाई करत नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular