शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेली ७२ तासांची मुदत अखेर संपली असून, त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. आपल्यावरील आरोप मागे घेऊन ७२ तासांमध्ये माफी मागावी, अन्यथा १०० कोटींचा दावा दाखल करू, अशी नोटीस अनिल परब यांनी सोमय्यांना पाठवली होती, परंतु ७२ तासानंतरही सोमय्यांनी माफी न मागितल्याने अखरे परबांनी हा दावा दाखल केला आहे.
पुढे परब म्हणाले कि, मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. किरीट सोमय्या यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप धाधांत खोटे असून हे लवकरच सिद्ध होईल. त्यांनी केवळ माझी बदनामी करण्यासाठी खोटे आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचं काम केल आहे आणि अजूनही तेच काम करत आहेत. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, पूर्ण खात्री आहे कि, यातून निर्दोष सुटू, असंही त्यांनी सांगितलं.
भाजप नेते किरीट सोमय्या हे निव्वळ बदनामी करण्याचं कारस्थान करत असून, कोर्टात आमचा निर्दोषपणा सिद्ध झाल्यावर, त्यामुळे कोर्टाकडून आम्हाला लवकरच सकारात्मक न्याय मिळेल. असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.
अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधत सांगितले कि, मागील काही महिने किरिट सोम्मया यांच्याकडे कोणतेही पुरावे नसताना केवळ आरोप करत सुटले आहेत. यासंदर्भात मी १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. यात खोटी बदनामी करण्याबाबत माफी मागण्याचीही मी मागणी केली आहे आणि त्या संदर्भातील पुरावेही सदर केले आहेत. त्यामुळे मला नक्कीच न्याय मिळेल.