27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeTechnologyआपल्या आयडीवर किती सिमकार्ड सुरु आहेत ?

आपल्या आयडीवर किती सिमकार्ड सुरु आहेत ?

आपल्या ओळखपत्रावर इतर कोणी व्यक्ती सीमकार्ड घेऊन वापरत असतात. असे असताना ते सीमकार्ड आपल्या नावावर असून सुद्धा काही वेळेला आपल्याला याची कल्पना देखील नसते. मात्र एखाद्याने जर आपल्या नावावरील सीमकार्डचा काही मिसयुज्ड केला तर उगीचच आपल्यावर कारवाई होऊ शकते. असे अनेक प्रकार आपण कित्येकदा घडलेले अनेकांच्या चर्चेतून ऐकिवात आले आहेत.

दूरसंचार विभागामार्फत टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अॅण्ड कंज्यूमर प्रोटेक्शन तयार करण्यात आले आहे. त्यासाठी विभागाने आपण आपल्या ओळखपत्रावर किती सीमकार्ड सुरू आहेत, याची माहिती मिळविण्यासाठी tafcop.dgtelecom.gov.in  हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. त्या साईटवर देशभरातील सर्व चालू स्थितीतील मोबाईल क्रमांकाचा डेटाबेस अपलोड करण्यात आला आहे. त्याचा निव्वळ उद्देश हा नकळत होणारी फसवणूक रोखणे हाच आहे. त्या माध्यमातून विशेष म्हणजे आपल्या आयडीवर जर अन्य इतर व्यक्ती सीमकार्ड वापरत असेल,  तर त्याची तक्रार देखील आपण काही सेकंदामध्येच करू शकतो.

भारत सरकारने अशा प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून,  तुमच्या ओळखपत्रावर ( आधारकार्ड / मतदान कार्ड इ.) किती सीमकार्ड सुरू आहेत, याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे. टेलिकॉम कंपनीच्या नियमानूसार,  एका व्यक्तिच्या आयडीवर जास्तीत जास्त नऊ सीमकार्ड घेतली जाऊ शकतात. नऊ पेक्षा अधिक सीम कार्ड सुरु असणाऱ्यांवर दूरसंचार विभागाने कारवाई करण्याचे ठरवले आहे.

तुमच्या नावावर किती सीमकार्ड सुरू आहे,  माहिती करून घेऊया थोडक्यात. सर्वप्रथम tafcop.dgtelecom.gov.in  या संकेतस्थळावर जावे, त्यानंतर समोर असणाऱ्या बॉक्समध्ये आपला मोबाईल क्रमांक टाकावा, त्यानंतर आलेल्या ओटीपी तिथे लिहल्यानंतर लॉगइन पर्याय आहे. आता समोर स्क्रीनवर तुमच्या आयडीवर किती सीमकार्ड सुरू आहेत हे दाखवण्यात येईल. जर लिस्टमध्ये दाखवल्या प्रमाणे जर त्यामधील एखादा नंबर तुम्ही वापरत नसाल,  तर त्याची तक्रार करण्यासाठी रिपोर्ट या पर्यायाचा वापर करावा. नंतर ‘This is not My Number’  हा पर्याय सिलेक्ट करा. आता वरती दिलेल्या एका बॉक्समध्ये तुम्हाला तुमची आयडी दृष्टीस पडेल. आता खाली दिलेल्या Report यावर क्लिक करा. त्या नंबरबाबत  तक्रार नोंदवल्यानंतर, एक रेफरेंस कोड दिला जातो. तो पुढील कारवाईसाठी जतन करून ठेवावा.

RELATED ARTICLES

Most Popular