27.9 C
Ratnagiri
Monday, September 8, 2025

जागा खरेदीसाठीही मिळणार घरकुल योजनेतंर्गत आर्थिक मदत

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे...

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीच्या नोबेल ऑटो पेट्रोल...

रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टो. ला जल फाऊंडेशनचे लाक्षणिक उपोषण

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य...
HomeRatnagiriबीच शॅक धोरणाला लवकरच परवानगी मिळण्याची अपेक्षा

बीच शॅक धोरणाला लवकरच परवानगी मिळण्याची अपेक्षा

सद्य घडीला पायलट प्रोजेक्ट म्हणून कोकणातील आठ किनाऱ्यांची निवड केली होती

कोकणाला लाभलेला नैसर्गिक आकर्षक समुद्रकिनारा आणि सुंदर वातावरनामुळे अनेक पर्यटक आपसूकच फिरण्यासाठी येथे येतात. कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आखले होते. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवर तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे.

त्यासाठी एका चौपाटीवर कमाल १० कुटी उभारता येण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी विशेष करून स्थानिकांना ते उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. या प्रकारचे बीच शॅक्स उभारण्यासाठी पर्यावरणाविषयक परवानगीची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव कोस्टल झोन मॅनेजमेंटकडे पाठविला असून, त्यांच्याकडून लवकरात तो प्रस्ताव मंजूर होईल, याबाबत माहिती संबंधित कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाने कोकणातील तीन किनार्यावर बीच शॅक्स उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा प्रस्तावामध्ये रत्नागिरीतील आरे-वारे किनाऱ्याचा समावेश केला आहे. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने विविध संकल्पना कोकणात राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये गोव्याच्या धर्तीवर बीच सॅक उभारण्याचा निर्णय घेतला होता.

सद्य घडीला पायलट प्रोजेक्ट म्हणून कोकणातील आठ किनाऱ्यांची निवड केली होती. त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे वारे आणि गुहागर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली या समुद्र किनाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आरे-वारे परिसरात हा प्रकल्प झाल्यास पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी स्थानिक व्यक्तींना ८० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. या कुटींचे तीन वर्षांकरिता वाटप करण्याचे निश्‍चित झाले होते.

रत्नागिरीतील आरे-वारे किनारी दहा शॅक्स उभारण्याचे नियोजन केले आहे. तसेच पर्यटकांसाठी किनाऱ्यावर सर्व सुविधा केंद्रही उभारले जाईल. वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी पार्किंग सुविधाही दिली जाणार आहे. यासाठी किनारी भागात किमान तीन एकर जागा अपेक्षित आहे.

RELATED ARTICLES

Most Popular