20.3 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeKokanगणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी रोहा ते चिपळूण मार्गावर धावणार मेमू ट्रेन

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी रोहा ते चिपळूण मार्गावर धावणार मेमू ट्रेन

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने चाकरमान्यांचा सणासुदीच्या काळातील प्रवास सुखकर व्हावा यासाठी येणाऱ्या गणेशोत्सव कालावधीत रेल्वेच्या विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत ही गाडी सुरु करण्यात आली आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या रोहा ते चिपळूण अशा विस्तारित केल्या जाणार आहेत.

तसेच गणेशोत्सव कालावधीत थेट कोकण विदर्भ जोडणारी नागपूर ते मडगाव ट्रेन सुरू होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. या निर्णयाचा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना फायदा होणार आहे. या आधी काही वर्षापूर्वी गणेशेत्सवाच्या कालावधीत चिपळूणपासून पनवेल ते चिपळूण अशी मेमू ट्रेन चालवण्यात आली होती. मात्र, रोहयाच्या पुढे कोकण रेल्वेमार्गावरून चिपळूणपर्यंत मेमू ट्रेन प्रथमच धावणार आहे.

या बाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ०११५७ / ०११५८ ही रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल गाडी दि.१९ ऑगस्ट २०२२ ते २१ ऑगस्ट २०२२, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२२, १० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ही मेमू स्पेशल ट्रेन रोहा येथून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी चिपळूण येथून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी ती रोह्याला पोहोचेल.

कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेमार्गावर रोह्याच्या पुढे मेमू स्पेशल ट्रेन प्रथमच धावणार आहे. या मेमू स्पेशलला माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे तसेच खेड या स्थानकांवर थांबे देण्यात आले असून चिपळूण पर्यंत धावणारी ही पहिलीच मेमू स्पेशल ट्रेन आठ डब्यांची असणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular