कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीअर आणि सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत योग्य आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. कोणतीही लेखी परीक्षा नसून, उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. उमेदवारांच्या अर्जांची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
७ फेब्रुवारी २०२२ रोजी थेट इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड सेक्टर-४०, सीवुड्स (वेस्ट), नवी मुंबई, ४००७०६ या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे यासाठी रजिस्ट्रेशन तेथेच सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत करण्यात येईल.
पद संख्या – १४
शैक्षणिक पात्रता –
सिव्हील/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये ग्रॅज्युएट किंवा समकक्ष पदवी मान्यता प्राप्त म्हणजेच AICTE शी संलग्न विद्यापीठातून किमान ५५ टक्के गुणांसह प्राप्त केलेली असावी.
वयोमर्यादा –
असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीयर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ वर्षे असावे.
सीनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी वय ३५ वर्षे असावे.
अधिक माहितीसाठी
Konkan Railway Notification Link
या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.