32.3 C
Ratnagiri
Wednesday, December 4, 2024

चिपळूण कापसाळ महामार्गावर गव्यांचा मुक्त संचार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराजवळील कापसाळ येथे...

हापूसचा हंगाम दीड महिन्यानी लांबला…

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण निर्माण...
HomeRajapurकोंढेतडच्या बाजूचा भराव जैसे थे, यंदाही पुराची भिती

कोंढेतडच्या बाजूचा भराव जैसे थे, यंदाही पुराची भिती

अर्जुना नदीपात्राच्या कोंढेतडच्या बाजूने टाकण्यात आलेला मातीचा भराव वा तेथील गाळ तत्काळ काढून टाकण्यात यावा. अन्यथा, त्या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर पुलाचे बांधकाम करताना नदीपात्राच्या मध्यभागामध्ये टाकण्यात आलेला भराव काढण्यात आला आहे. कोंढेतडच्या बाजूचा टाकण्यात आलेला मात्र अजूनही भराव जैसे थेच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नदीपात्रही अरुंद झाले आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यामध्ये हा मातीचा भराव नदीच्या पाण्यासोबत वाहून जाऊन कोंढेतड पूल ते बंदरधक्का परिसरामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात साठा झालेला आहे. यावर्षीही पावसाळ्यामध्ये तशीच स्थिती निर्माण  होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या मातीच्या भरावामुळे गतवर्षीप्रमाणे या वर्षीही शीळ-गोठणे दोनिवडे रस्त्याला धोका संभवत असून शहरालाही पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  महामार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या येथे अर्जुना नदीपात्राच्या कोंढेतडच्या बाजूने टाकण्यात आलेला मातीचा भराव वा तेथील गाळ तत्काळ काढून टाकण्यात यावा. अन्यथा, त्या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपचे पदाधिकारी आणि कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांच्यासह शहरातील व्यापाऱ्‍यांनी दिला आहे. वेळेमध्ये गाळ उपसा न होता, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका उद्भवल्यास पूल बांधकामाची ठेकेदार कंपनीची जबाबदार राहील,  असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

कोदवली आणि अर्जुना नदीपात्रामध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ गेल्या अनेक वर्षापासून राजापूरकरांची डोकेदुखी ठरलेला आहे. त्यामध्ये आता कोंढेतड पूल ते बंदरधक्का या दरम्यान, नदीच्या कोंढेतड बाजूला मोठ्या प्रमाणात साठलेल्या गाळामध्ये भरच पडत आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही नदीच्या पाण्याचा प्रवाह राहिल्यास पुंडलिक मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच, नदीच्या पाण्याचा प्रवाह मंदिराच्या दिशेने वा बाजूने राहिल्यास पूरस्थितीमध्ये बंदरधक्का परिसर आधीच्या तुलनेमध्ये लवकर पुराच्या पाण्याखाली जाईल.

RELATED ARTICLES

Most Popular