27 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriकोकण एलएनजी बंदर ऑल वेदर पोर्ट घोषित...

कोकण एलएनजी बंदर ऑल वेदर पोर्ट घोषित…

तीन वर्षांत ही क्षमता ६.३ दशलक्ष टनपर्यंत वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे.

कोकण एलएनजी गॅस टर्मिनलमधील बंदर आता ऑल वेदर पोर्ट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या बंदरातील ब्रेक वॉटर वॉलचे काम पूर्ण झाले आहे. जून महिन्यात या बंदरावर गेलच्या मालकीचे पहिले जहाज ‘गेल भुवन’मधून गॅस उतरवून घेण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर आणखी दोन जहाजांतून गॅस उतरविण्यात आला. तालुक्यातील कोकण एलएनजी टर्मिनलमधील बंदरात महाकाय गॅसवाहू जहाजातील द्रवरूप गॅस उतरविला जातो. गॅस उतरवताना समुद्रातील पाणी संथ राहणे गरजेचे असते. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने या बंदरातील कामकाज चार महिने बंद होते. ही समस्या सोडविण्यासाठी खोल समुद्रात ब्रेक वॉटर वॉल बांधण्याचे काम गेली ४ वर्ष सुरू होते या ब्रेक वॉटर वॉलचे काम मे महिन्यात पूर्ण झाले. त्यामुळे गेल इंडिया लिमिटेडच्या कोकण एलएनजी टर्मिनलच्या बंदरात ६ जूनला पावसाळ्यातील पहिले गॅसवाहू जहाज आले.

या जहाजातील द्रवरूप नैसर्गिक वायू बंदरावर उतरवून घेण्यात यश आले. या वेळी गेलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संदीप कुमार गुप्ता, संचालक संजय कुमार उपस्थित होते. त्यानंतर दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत संदीपकुमार गुप्ता यांनी कोकण एलएनजी टर्मिनल हे ऑल वेदर पोर्ट असल्याची घोषणा करण्यात आली. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, “ही घटना कोकण एलएजी टर्मिनलसाठी ऐतिहासिक आहे. आता या प्रकल्पात वर्षभर अखंड सेवा देण्याऱ्या युगाची सुरुवात झाली आहे. पावसाळ्यातील समुद्राच्या उंच लाटांपासून जहाजाचे संरक्षण करण्यासाठी बांधलेल्या ब्रेक वॉटर वॉलमुळे हे शक्य झाले आहे. ही ब्रेकवॉटर ‘आयलंड स्ट्रक्चर’ असून ती थेट किनाऱ्याला जोडलेली नाही. ही रचना प्रगत समुद्री अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

“क्षमता ६.३ दशलक्ष टनापर्यंत वाढविणार – बंगळूर आणि पनवेलपर्यंत पाईपलाइनद्वारे गॅसची वाहतूक करण्यामध्ये कोकण टर्मिनलची एलएनजी महत्त्वाची भूमिका आहे. भारतातील विविध भागांत पाईपलाइनद्वारे एलएनजी पोहोचविण्याची क्षमता आता वाढणार आहे. या टर्मिनलची गॅस उतरवून घेण्याची क्षमता आजपर्यंत ५ दशलक्ष टन इतकी होती. आता पुढील तीन वर्षांत ही क्षमता ६.३ दशलक्ष टनपर्यंत वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular