27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeRatnagiriकोकणातील पहिली हापूसची पेटी रवाना

कोकणातील पहिली हापूसची पेटी रवाना

मोहोरानंतर फळ तयार होईपर्यंत शितप यांनी काळजी घेतली.

तालुक्यातील करबुडे येथील बागायतदार रुपेश अनंत शितप यांच्या रत्नागिरीतील बागेतून हापूस आंब्याची मुहूर्ताची पहिली पेटी मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी वाशी मार्केटला रवाना झाली. ऑक्टोबर महिन्यात हापूसची पेटी जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले. गतवर्षी आंबा हंगाम यथातथाच होता. यंदा जून महिन्यात मोसमी पाऊस उशिराने दाखल झाला. या कालावधीत उन्हाचा कडाका होताच. रुपेश शितप यांच्या रत्नागिरीत शहराजवळील भाटये येथील आंबा बागेतील एका उंच हापूसच्या झाडाला ऑगस्ट महिन्यात मोहोर आल्याचे लक्षात आले. या झाडाला लवकर पालवी फुटून ती जून झालेली होती. याच कालावधीत पावसाने उघडीप दिली आणि उन्हाचा कडाका सुरू होता. त्यामुळे झाडाला बसलेल्या ताणामुळे मोहोर आला.

पावसाळ्यात मोहोर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर तो सुरक्षित ठेवण्यासाठी बागायतदार रुपेश शितप यांनी पावले उचलली. रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औषध फवारणी केली. बागेतील ते झाड सुमारे ८० ते ९० फूट उंच असल्यामुळे मोहोराच्या सुरक्षिततेसाठी कसरत करावी लागली. मोहोरानंतर फळ तयार होईपर्यंत शितप यांनी काळजी घेतली. सुदैवाने त्यांच्या मेहनतीला यशही आले. मोठ्या आकाराचे फळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी त्यांनी फळांची काढणी केली. चार डझनची पेटी म्हणजेच ४८ फळं शितप यांनी वाशी बाजारात विक्रीसाठी व्यापाऱ्याकडे पाठवली आहेत. ही पेटी बुधवारी वाशीमध्ये पोहोचेल.

पावसात आलेल्या मोहोराची योग्य काळजी घेतल्यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यात हापूसची चव चाखायला मिळणार आहे. यापूर्वी शितप यांच्या बागेतून दिवाळीच्यानंतर हापूसची पेटी पाठविण्यात आली होती; परंतु ऑक्टोबर महिन्यात प्रथमच हापूसची पेटी बाजारात विक्रीसाठी पाठविल्याचे रुपेश यांनी सांगितले. दरम्यान, हापूसचा हंगाम खऱ्या अर्थाने मार्च ते जून पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. काहीवेळा फेब्रुवारीच्या अखेरीस आंबा बाजारात दाखल होतो; परंतु पावसाळा संपल्यानंतर या पद्धतीने आंबा पेटी बाजारात गेल्याची नोंद प्रथमच झाली आहे. अनियमित पावसामुळे झाडांना मोहोर येण्याचे प्रकार घडत असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular