24.4 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...

खडपोलीतील पुलांच्या छिद्रांतून झिरपते सार्वजनिक सुरक्षा…

खडपोलीतील पूल खचल्यानंतर पुन्हा एकदा सार्वजनिक पायाभूत...
HomeRatnagiriसवलतीच्या लाभासाठी 'लालपरी'ला पसंती - रत्नागिरी विभाग

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

ज्येष्ठ नागरिकांसह महिला, तरुणी सवलतीचा लाभ घेत आहेत.

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या महिला तरुणी, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ ज्येष्ठ नागरिक, महिलांनी मोठ्या प्रमाणात घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दीड कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणींनी मागील ७ महिन्यात प्रवासाचा लाभ घेतला. त्यामुळे रत्नागिरी विभागाच्या उत्पन्नात भर पडली आहे. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी एसटी बसचा प्रवास मोफत तर ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा लाभजिल्ह्यातील महिला, तरुणी व ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. त्यामुळे एसटीलाही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. मागील तीन वर्षात लालपरी ही महिला, ज्येष्ठ नागरिकांची आधार बनली आहे. एसटीतून प्रवासासाठी महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत दिल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महिला, तरुणी या एसटीबसमधूनच प्रवास करत आहेत.

वाट पाहेन; पण लालपरीतूनच प्रवास करणार, यामुळे महिलांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सात महिन्यांत ७० ते ८० लाख महिलांनी प्रवास केला आहे. ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनपरवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र, केंद्र व राज्यशासनामार्फत निर्गमित केलेले एक ओळखपत्र वाहकाला दाखवल्यास शून्यमुल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येतो. ६५ वषपिक्षा वय, महिला, तरुणी टक्के सवलत, १२वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना अहिल्याबाई होळकर योजना-मोफत पास दिला जातो. १५१ किमीपेक्षा जास्त प्रवास पुरुषांना १५ टक्के सवलत देण्यात देते.

एसटीकडील कल वाढतोय – ज्येष्ठ नागरिकांसह महिला, तरुणी सवलतीचा लाभ घेत आहेत. त्यामुळे एसटी बसला मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे. गणेशोत्सवात व आषाढीवारीतही ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणींनी सवलतीचा लाभ घेतला असल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular