स्त्रीचे सौंदर्य हे जात्याच नाजूक, सुंदर, मादक, कमनीय असे वर्णन केले जाते. प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी असते. काही जणांना एखाद्या मुलीमध्ये तिचे डोळे, केस, तीच हसण आवडत तर काहीना तिची बुद्धी, विचार करायची पद्धत, स्वभाव इत्यादी गोष्टी सुद्धा आवडू शकतात. शेवटी सौदर्यं हे नजरेत असतं, पण त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर माणसाकडे मन सुद्धा तेवढेच स्वच्छ आणि निर्मळ असावं लागतं.
तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर सौंदर्य कळतं. पण अनेक जणांना अगदी निरखून पारखून बघायची सवय असते. अस मिश्किलपणे म्हटलेलं ऐकिवात आहे कि, “बाईकडे अति निरखून बघितल तर, तिच्या मिशाही दिसतात”. पण खरच एखाद्या महिलेच्या ओठांच्या वर आणि हनुवटीवर जराशी दाढी सदृश्य लव जरी दिसली तरी प्रत्येकाची नजर त्यावर स्थिरावते. पण कल्पना करा जर अशीच एखादी स्त्री तुम्हाला पहायला मिळाली तर, जी पुरुषांप्रमाणे दाढी मिशी ठेवते. जाणून घेऊया अशाच एका स्त्री बद्दल.
सध्या सोशल मीडियावर एक दाढीमिशीवाली स्त्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण हि मिशी आणि दाढी असलेली सुंदर तरुणी पाहून नक्कीच तिच्या प्रेमात पडाल. कारण, पुरुषांसारखी मिशी-दाढी असनूही तीच्या सौंदर्यामध्ये कुठेही कमी नाही. या स्त्रीचं नाव आहे हरिनाम कौर. हरिनाम हि जगातील १४ विशेष महिलांपैकी एक आहे, जी महिला असून त्यांचे शरीरयष्टी मात्र पुरुषांसारखी असते. हरिनाम कौर सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्य करते. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
जगातील कित्येक नामांकित संस्थां तिचा फोटो कव्हर फोटो मिळावा म्हणून तिच्या संपर्कात असतात. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्येही हरिनाम कौर हिच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. हरिनाम १२ वर्षांची असताना, तिला ‘पाॅलिसिस्टिक ओवरी सिड्रोम’ (PCOS) नावाचा आजार झाला. या कारणामुळे इतर मुलींच्या तुलनेत हरिनामच्या शरीरावरील केसांची वाढ वेगवान गतीने होऊ लागली. मुलांप्रमाणे तिला चेहऱ्यावर देखील दाढीसारखे केस वाढू लागले. त्यामुळे शाळेत, तिचे मित्र-मैत्रिणी, शेजारी तिला खूपच अपमानास्पद वागणूक देत असत.
पण या कठीण काळात सुद्धा तिने या गोष्टीचा संकोच न करता, तिच्या कमजोरीला तिची ताकद बनवली. चेहऱ्यावर केस येऊ नये साठी हरिनामने अनेक क्रीम आणि वैद्यकीय उपाय सुद्धा केलं. पण, ते व्यर्थ गेल्याने, शेवटी हरिनामने स्वतःला आहे तशी स्वीकारलं. आणि आज तिची सर्वत्र खूप ख्याती आहे .