29.1 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

बहुजनांनी ओबीसी झेंड्याखाली एकत्र यावे – चंद्रकांत बावकर

कुणबी समाजासह ओबीसी समाजाच्या विकासासाठी संघटन होण्यासह...

सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय...

रत्नागिरी ‘लायन्स क्लब’च्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ

लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर...
HomeRajapurराजापुरातील गोवळमध्ये बिबट्या पिंजराबंद

राजापुरातील गोवळमध्ये बिबट्या पिंजराबंद

तालुक्यातील गोवळ चौकटवाडी येथील वहाळात बस्तान ठोकून बसलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला २४ तासानंतर यश आले. प्रदिर्घकाळ चाललेल्या या रेस्क्य ऑपरेशनमध्ये वनविभागाचा चांगलाच कस लागला बुधवारपासून वहाळात ठाण मांडलेल्या बिबट्याला गुरूवारी सकाळी वनविभागाने ताब्यात घेतल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला. बिबट्याला पिंजऱ्यात पकडल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.गोवळ चौकटवाडी येथील शिमगोत्सवाच्या मांडालगत असलेल्या वहाळात बुधवारी सकाळी बिबट्या बसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. बराचवेळ बिबट्या जागेवरून हलत नसल्याने ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर राजापूर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या अशक्त बनल्याने त्याला पळता येत नव्हते. त्यामुळे त्याला पिंजऱ्यात पकडण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू होता. मात्र वनविभागाचे अधिकारी जवळ गेल्यानंतर बिबट्या त्यांच्यावर हल्ला करत असल्याने बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करणे जिकिरीचे बनले होते.

दगडांच्या कपारीत :- बुधवारी सकाळपासून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांना बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. अखेर गुरूवारी सकाळी बिबट्या वहाळातील मोठ्या दगडांच्या कपारीत जाऊन बसला. त्यानंतर वनविभागाने वहाळात पिंजरा लावून सर्व बाजूंनी मोठी जाळी लावली. गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले. बिबट्याला पिंजऱ्यात पकडल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

सुमारे २४ मोहिम :- सुमारे २४ तासाहून अधिक काळ चाललेल्या या मोहिमेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा चांगलाच कस लागलेला पहायला मिळाला. भर वस्तीलगत असलेल्या वहाळात बिबट्या ठाण मांडून बसल्याने ग्रामस्थांचीही पाचावर धारण बसली होती. मात्र बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर ग्रामस्थांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सुटकेचा निःश्वास टाकला.या मोहीमेमध्ये रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सुरज तेली, विजय म्हादये, दीपक म्हादये, प्रथमेश म्हादये, लांजा वनपाल श्री. आरेकर, वनरक्षक विक्रम कुंभार, देवरूखं वनपाल तौफीक मुल्ला, श्री.माळी, श्री. साबणे यांनी मोलाची भूमिका बजावली. गोवळमधील ग्रामस्थांनीही या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनविभागाला सहकार्य केले.

RELATED ARTICLES

Most Popular