24.4 C
Ratnagiri
Wednesday, November 13, 2024

हरचिरी-उमरेत पकडली ७६ वानर-माकडे , आंबा बागायतदारांना दिलासा

गेल्या महिन्यात सुमारे ७० वानर माकडे पकडण्यात...

चिपळूणचे मटण, मच्छीमार्केट १८ वर्षे बंद

चिपळूण शहरातील मटण आणि मच्छीविक्रीचा प्रश्न गंभीर...

कोयना धरणातून यंदा उन्हाळ्यात पुरेशी वीजनिर्मिती

कोयना धरणातून यावर्षी पावसाळ्यात १८ टीएमसी पाणी...
HomeRajapurराजापुरात पाच वर्षांतील कमी पाऊस

राजापुरात पाच वर्षांतील कमी पाऊस

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

दमदार प्रारंभानंतर पावसाने यावर्षी सातत्य राखलेले नाही. त्याचा प्रतिकूल परिणाम भातशेतीच्या यावर्षी उत्पन्नावर होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम भूगर्भातील जलसाठ्यावर होण्याची शक्यता असून, त्यातून तालुक्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांत यावर्षी सर्वात कमी पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे दरवर्षी तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना कोदवली नद्यांना पूर येतो. यावर्षी पुराची तीव्रता फारशी जाणवली नाही. कमी पडलेल्या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे तालुक्याला उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी तालुक्यामध्ये कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिले दोन दिवस वगळता आता वातावरण सूर्यप्रकाशित आहे. ऑक्टोबर हीटची तीव्रता वाढली असून, परतीचा पाऊस पडण्याची शक्यताही कमी दिसत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम भूगर्भातील जलसाठ्यावर होण्याची शक्यता आहे. अनेक गावांत गतवर्षी टंचाई – तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावांमधील वाडी-वस्त्यांना यावर्षी पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या होत्या.

केळवली येथील ठोसरवाडी, मधलीवाडी, खालची हर्याणवाडी, नाटे येथील गणेशनगर, नजफनगर, तुळसवडे-सोलिवडे येथील गराटेवाडी, शिवगणवाडी, घुमेवाडी यांनी टँकरची मागणी केली होती. नाटे येथील गणेशनगर, नजफनगर, जुवाठी, हसोळतर्फ सौंदळ, सोल्ये येथील ग्रामस्थांना जूनच्या पहिल्या आठवड्यात टंचाईला सामोरे जावे लागले होते. टंचाईग्रस्त गावे, वाडी- वस्त्यांनी टँकरची मागणी केली होती… तरीही प्रशासनाकडून एकही टँकर, पुरविण्यात आला नव्हता. टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यामध्ये प्रशासनाला तांत्रिक अडचणींना सामना करावा लागला होता.

RELATED ARTICLES

Most Popular