27.7 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriएलआयसी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

एलआयसी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

एलआयसी विमा प्रतिनिधी आणि ग्राहकांच्या प्रलंबित  मागण्यांकरिता लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली दोनशेहून अधिक विमा प्रतिनिधींनी एकदिवशीय लाक्षणिक ठिय्या आंदोलन केले आहे.

रत्नागिरीतील एलआयसी कार्यालयाबाहेर एलआयसी विमा प्रतिनिधी आणि ग्राहकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली दोनशेहून अधिक विमा प्रतिनिधींनी एकदिवशीय लाक्षणिक ठिय्या आंदोलन केले आहे. १ सप्टेंबरपासूनच एलआयसी विमा प्रतिनिधींनी असहकार आंदोलन पुकारले होते. त्याचाच पुढील भाग म्हणजे आजचे ठिय्या आंदोलन.

एलआयसी पॉलिसी हप्त्यांवरील जीएसटी रद्द व्हावा, विमा प्रतिनिधींना मेडिक्लेम मिळावा, पेन्शन मिळावी, भविष्य निर्वाह निधी लागू करावा, पॉलिसीवरील बोनस वाढवून मिळावा, विमा प्रतिनिधींच्या ग्रॅच्युइटीमध्ये वाढ करण्यात यावी, प्रतिनिधींना टर्म इन्शुरन्स वाढवून द्यावा, त्यांना न्याय व प्रतिष्ठा मिळावी, अशा विविध मागण्यासाठी यावेळी करण्यात आली आहे. आमची लढाई विमा पॉलिसीधारक आणि विमा प्रतिनिधी यांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. सर्व संघटनांनी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे रत्नागिरीचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी सांगितले.

पाच वर्षांहून अधिक काळ बंद राहिलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याकरिता संधी मिळावी, ग्राहकांच्या प्रतिसादाकरिता रेटिंग प्रणाली चालू करावी, विमा हप्त्यावरील जीएसटी रद्द करावा, ग्राहकांचा बोनस वाढावा, कर्जाचे व विलंब शुल्काचे व्याजदर कमी व्हावेत, अशा प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या. तसेच विमा प्रतिनिधांना मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स आणि बोनस वाढला पाहिजे अशा मागण्याही केल्या. यावेळी विमा प्रतिनिधींनी घोषणाबाजी केली.

सामान्य ग्राहकांकडून प्रत्येक वेळी केवायसी मागू नये, अशा मागण्या ग्राहकांकरिता केल्या आहेत. प्रतिनिधींकरिता २० लाखापर्यंत ग्रॅच्युइटी, २०१३ व २०१६ च्या आयआरडीएआय राजपत्र अधिसूचनेनुसार आयोग नेमावा, समूह विमा वाढवावा, क्लबच्या सदस्यांना घरासाठी ५ टक्के व्याजाने कर्ज मिळण्याची मागणीही केली आहे. सकाळी १० पासून सुरु असलेल्या या आंदोलनाला बहुसंख्य ग्राहकांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular