सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दररोज हजारो प्रवासी एसटी बसनं प्रवास करतात. हा प्रवास स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो. सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीमध्ये अनेक बदल केले जात आहेत. यामध्ये आता आणखी एका सुविधेची भर पडली आहे. आता रेल्वेप्रमाणेच घरबसल्या एसटी बसचे लोकेशन देखील ट्रॅक करता येणार आहे. सध्या या अॅपवर काम सुरु आहे. प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन आता आता रेल्वेप्रमपाणेच एसटी बसचं लोकेशन आता ट्रॅक करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अॅपची सुविधा लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे.
सध्या या सुविधेची चाचणी सुरू असून, यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातून सुमारे ५५० बसेस विविध मार्गावर धावतात, या सर्व बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र सध्या या अॅपची सेवा केवळ अधिकारी, कर्मचारी यांच्या पुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. एसटीचे लोकेशन अचूक मिळत आहे कि नाही याची सध्या चाचणी सुरु आहे. यातील काही तांत्रिक अडचणी दूर करून लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.