26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeSindhudurgचिपी विमानतळामध्ये होणाऱ्या नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे

चिपी विमानतळामध्ये होणाऱ्या नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे

सिंधुदुर्ग येथे नव्याने सुरु झालेल्या चिपी येथील विमानतळामध्ये होणाऱ्या नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी कुडाळ तालुका भाजपच्यावतीने विमानतळ अधिकारी किरण कुमार यांची भेट घेण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु झालेल्या विमानतळामुळे स्थानिक सुशिक्षित युवक युवतींना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावेळी विमानतळ अधिकारी किरण कुमार यांनी करण्यात आलेल्या मागणीवर सकारात्मकता दर्शवून, सांगितले की,  या ठिकाणी होणार्या प्रत्येक भरतीसाठी जास्तीत जास्त स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांच्या सूचनेवरून कुडाळ तालुका भाजपच्या वतीने सिंधुदुर्ग विमानतळाचे अधिकारी किरण कुमार यांची भेट घेण्यात आले. यावेळी मंडल सरचिटणीस देवेन सामंत, योगेश घाडी, प्रितेश गुरव, प्रदीप जाधव, शुभम राणे, विनोद सावंत व जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे व दादा साईल यांनी सांगितले की नोकर भरती मध्ये स्थानिकांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे तसे न झाल्यास आम्ही पुढील पाऊल उचलू असे सांगितले.

विमानतळ अधिकारी किरण कुमार यांनी सांगितले की, ज्या युवकांचे तांत्रिक शिक्षण घेतलेले आहे, त्यांना त्या पद्धतीने नोकरीमध्ये सामावून घेतले जाईल आणि ज्यांनी तांत्रिक शिक्षण घेतलेले नाही त्यांना सुद्धा इतर ठिकाणी नोकर भरतीसाठी सामावून घेतले जाईल याठिकाणी स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही प्रकारे स्थानिकांना वगळून बाहेरील लोकांना प्राधान्य दिले जाणार नाही. असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular