गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या म ोठ्या प्रमाणात आहे. पण मागील दशकभरापासून मुंबई-गोवा महामार्ग अद्याप पूर्णपणे तयार झाला नाही. त्यामुळे कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने परवड होते. हा त्रास नेहमीचाच झाला आहे. आता या त्रासातून थोडासा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथील पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे, त्यामुळे माणगाव आणि महाड यादरम्यानचा प्रवास सुकर होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत कोकणकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथील उड्डाण पुल गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. माणगाव आणि महाडच्या दरम्यान असलेल्या या पुलाचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. यामुळे याच परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत होती. या वर्षी या भागात वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी तात्पुरती खुली केली जाणार आहे.
यामुळे कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि महाड दरम्यान लोणेर हे गाव येते. येथे दोन वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. पुल मध्यभागी आणि दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड अशी या ठिकाणी रचना आहे. दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड अरूंद आहेत. यामुळे या ठिकाणी बॉटल नेक सारखी परिस्थिती निर्माण होते. महाड अगर माणगावकडून येणारी वाहतूक अरूंद सर्व्हिस रोड आणि पूलाच्या बांधकामामुळे आडते. यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून हा पुल खुला झाल्याने सुटका होणार होणार आहे.