19.8 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunलोटे एमआयडीसीत पे-पार्किंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट

लोटे एमआयडीसीत पे-पार्किंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट

नक्की या पे-पार्किंगच्या सुविधेला नक्की कोणाचा वरदहस्त आहे याबद्दल चर्चा सुरु आहे.   

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहन पार्क करण्यासाठी पे-पार्किंगच्या सुविधा उपलब्ध आहेत. वाहन सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन चालक सुद्धा अशा वेळी पार्किंग करण्यासाठी पैसे देतात. परंतु, काही ठिकाणी मात्र पे-पार्किंगच्या नावाखाली पैसे उकळण्याचे धंदे सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. राजरोस पार्किंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट सुरु असल्यामुळे, नक्की या पे-पार्किंगच्या सुविधेला नक्की कोणाचा वरदहस्त आहे याबद्दल चर्चा सुरु आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी एरिया मानल्या जाणार्या लोटे एमआयडीसीमध्ये पे- पार्किंगच्या नावाखाली शेकडो मालवाहतूक करणार्‍या ट्रक, टँकर आणि कंटेनर चालकांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ट्रान्स्पोर्ट चालक आणि आवाशी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी त्या पार्किंग यार्डला भेट देवून सदरचा हा प्रकार उघडकीस आणला आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना ग्रामपंचायत आणि पोलिसांमार्फत पुढील कारवाई होईल, असे आवाशी गावचे सरपंच राज आंब्रे यांनी सांगितले. लोटे एमआयडीसी परिसरात आवाशी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुप्रीम इंटरप्रायजेस या नावाने गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत पे-पार्किंग सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी केवळ एमआयडीसी मधील हिंदुस्थान युनिलिव्हलर प्रा. लि. या कंपनीमधील येणारे ट्रक, टँकर आणि कंटेनर पार्किंग केले जातात. असे त्या पार्किंगचे व्यवस्थापक अब्रार यांनी सांगितले. मात्र ट्रान्सपोर्ट चालकांकडून या कंपनीत येणार्‍या वाहनांकडून प्रती वाहन २०० रुपयांप्रमाणे सुप्रीम इंटरप्रायजेसच्या नावाने पैसे आकारले जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या वृत्तीला वेळीच आळा बसावा यासाठी ग्रामस्थ, सरपंच आणि ट्रान्सपोर्ट चालकांनी मिळून हि बाब उघडकीस आणली.

RELATED ARTICLES

Most Popular