26 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

एसटी प्रशासनाकडून लोकेशन अॅप’ची केवळ घोषणा

लालपरी'चे अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर...

पीकविमा योजनेत खेड-दापोली आघाडीवर…

प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी...

परतीचा प्रवास ठरला कोंडीचा… वाहनांच्या रांगा

गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारपासून सुरू...
HomeKokanख्रिसमस स्पेशल मडगाव–पनवेल स्पेशल ट्रेन सुरु

ख्रिसमस स्पेशल मडगाव–पनवेल स्पेशल ट्रेन सुरु

रेल्वे प्रशासनाने कोरोनाचा संक्रमण कमी झाल्यामुळे कोरोना कालावधीसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे तिकिट दरही अधिक होते. त्याचा भुर्दंड सामान्य जनतेला बसत होता. नुकतेच यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेत रेल्वेने विशेष गाड्या नियमित सोडण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार मांडवी एक्स्प्रेस, रत्नागिरी मडगाव एक्स्प्रेस, मडगाव मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस, मडगाव-रत्नागिरी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, मडगाव-मंगळूरु सेंट्रल एक्स्प्रेस, मंगळूरु सेंट्रल ते मडगाव एक्स्प्रेस या गाड्या नेहमीप्रमाणे जुन्या वेळेनुसार आणि त्यावेळच्या तिकिट दरानुसार धावणार आहेत.

त्याच बरोबर रेल्वे प्रशासनाने ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्याना होणारी तुफानी गर्दी पाहता रेल्वेने कोकण मार्गावर मडगाव- पनवेल स्पेशल गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ नोव्हेंबरपासून मडगाव ते पनवेल या कोकण रेल्वे मार्गावर साप्ताहिक नवीन गाडी धावणार असल्याचे जाहीर केले आहे. २१ नोव्हेंबर ते ३ जानेवारीपर्यंत ख्रिसमस व नववर्षानिमित्ताने ही विशेष गाडी दर रविवारी सायंकाळी ४ वा. मडगावहून सुटेल तर २२ नोव्हेंबर पासून दर सोमवारी सकाळी ६ वा. पनवेलवरून रवाना होणार आहे.

०१५९६/०१५९५ क्रमांकाची मडगाव-पनवेल स्पेशल मडगाव येथून सायंकाळी ४ वाजता सुटणार असून,  दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ३ वाजून १५ मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. हि गाडी दर रविवारी धावणारी स्पेशल ३ जानेवारीपर्यंत चालवण्यात येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आणि परत मडगावला जाण्यासाठी पनवेलवरून दर सोमवारी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटून त्याचदिवशी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मडगावला पोहोचेल. या २२ डब्यांच्या स्पेशल गाडीला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular