25.3 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeIndiaराज्यपालांच्या वक्तव्याने एकच गहजब, समाज माध्यमांवर निषेध

राज्यपालांच्या वक्तव्याने एकच गहजब, समाज माध्यमांवर निषेध

चाणक्याशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल! तसेच “समर्थ नसते तर शिवाजीना कुणी विचारलं असतं का !'  असं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक असं वक्तव्य केलं आहे, ज्यावरुन सर्वत्र नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात करणे सुरु आहे. त्यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये ते म्हणाले, चाणक्याशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल! तसेच “समर्थ नसते तर शिवाजीना कुणी विचारलं असतं का !’  असं वक्तव्य केलं आहे.

त्या सोबतच त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देत, शिवाजी महाराजांना कमी लेखतोय असं नाही. पण ज्या माणसाला गुरु नाही, त्याची महती उरत नाही,  असं वक्तव्य केलं आहे. समर्थ रामदासांच्या कृपेनं आम्हाला राज्य मिळालं असं शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं. त्याच बरोबर गुरुदक्षिणा म्हणून राज्याच्या चाव्या तुम्हाला देतो, असंही समर्थ रामदासांना शिवरायांनी म्हटलं होतं, असं सुद्धा राज्यपालांनी यावेळी म्हटलंय.

कोश्यारी यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आक्षेप नोंदविला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोर्टाची कागदपत्रं पोस्ट करत राज्यपालांचं म्हणणं पूर्णपणे खोडून काढलं आहे. त्याचप्रमाणे शरद पवार यांचा एक व्हिडीओ देखील सोबत दाखवला आहे. नाशिक जिल्हा राष्ट्रवादीने तर राज्यपाल हटाव मोहीम सुरू करून राष्ट्रपतींना पत्रं पाठवण्यास सुरुवात केली आहे. आम. रोहित पवार यांनी सुद्धा राज्यपालांच्या विधानावर निषेध नोंदवून, सडेतोड उत्तर दिले आहे.

आता या वादात खासदार उदयनराजे भोसले यांनीही आपले मत प्रदर्शित केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तमाम शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यपालांनी इतिहास जाणून घेऊन मगच वक्तव्य करायला हवे होते. त्यामुळे राज्यपालांनी आपलं विधान त्वरीत मागे घ्यावे, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्यामुळे आता या वादावर राज्यपाल आपली काय प्रतिक्रिया देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular