गेली काही दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यास कंपनी अपयशी ठरली आहे. ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची जबरदस्ती केली जात आहे, ती थांबवा. वीज जोडणीसाठी अर्जकरून चार महिने जोडणी मिळत नाही, अशा अनेक गंभीर प्रश्नांवर येत्या १० दिवसांमध्ये महावितरण कंपनीने सुधारणा करावी. आता आम्ही सौजन्याने सांगतोय नंतर मात्र कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटतील, असा सज्जड दम उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भरला. जिल्ह्यातील वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. रत्नागिरी तालुक्यातील असे अनेक गावं आहेत. त्यापैकी खरवते उपकेंद्राअंतर्गत असलेल्या गावांमध्ये लाईटच्या अडचणी वारंवार येत आहेत.
त्याठिकाणी वायरमनसुध्दा उपलब्ध नाहीत, तसेच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती असल्यामुळे गावांतील गंजलेले पोल व उच्चदाब लाईनवरील झाडे/साफसफाई पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला, भुमिगत केबलचे कामसुब्दा अपूर्ण असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. सध्या घरोघरी स्मार्ट मिटर बसविण्यात येत आहेत. त्यासंदर्भात पक्षातर्फे स्मार्ट मीटरला विरोध असल्याचे निवेदन देण्यात आलेले असूनही प्रत्येक गावात स्मार्ट मीटर बसविण्यात येत असलेले मीटर तात्काळ बंद करावेत. अनेकांनी विद्युत जोडणीसाठी अर्ज केला आहे. परंतु ४ महिने झाले तरी लीकांना वीज जोडणी दिली जात नाही. अनेकांच्या गोठ्यांम ध्ये जनावरांवर पंखे सुरू आहेत. परंतु आम्हा माणसांना तुम्ही वीज जोडणी देऊ शकत नाही. हा कसला कारभार सुरू आहे. जाणीवपूर्वक करत असाल तर खपवुन घेतले जाणार आहे.
दहा दिवसांची मुदत – येत्या दहा दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ज्या काही अडचणी आहेत, त्या सोडवा. १० दिवसांनी आम्ही येऊन आढावा घेणार. त्यामध्ये सुधारणा झाली नसले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. आम्ही आता सौजन्याने वागत आहोत, पुन्हे येऊ तेव्हा सुधारणा झाली नाही, तर कार्यालयाच्या काचा रहाणार नाहीत, असा इशारा उबाठा पदाधिकाऱ्यांनी दिला. उबाठाचे उपनेते बाळ माने, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, महिला आघाडी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.