26.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeRatnagiriमहावितरणची ३५ कोटींची थकबाकी वसुलीसाठी आक्रमक पावले

महावितरणची ३५ कोटींची थकबाकी वसुलीसाठी आक्रमक पावले

शहरी व ग्रामीण दोन्ही भागांतील ग्राहकांकडे मोठी थकबाकी आहे.

जिल्ह्यात महावितरणच्या वीजग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याचे पुढे आले आहे. सर्वच ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे. एकूण १ लाख २२ हजार ७७ ग्राहकांकडील ३५ कोटी २९ लाखांची वीजबिले थकीत आहेत. यामध्ये शासकीय बिलांचाही समावेश आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे. जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात आहे. या विभागात ५६ हजार ५४८ ग्राहकांकडे १६ कोटी ४८ लाखांची थकबाकी आहे. त्या खालोखाल खेड विभागात ३४ हजार ८६१ ग्राहकांकडे १०.५८ कोटी आणि चिपळूण विभागात ३० हजार ६६८ ग्राहकांकडे ८.२३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहिल्यास, रत्नागिरी (शहरी) विभागात सर्वाधिक १० हजार ८३१ ग्राहकांकडे ५.७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यानंतर चिपळूण (ग्रामीण) विभागात ९ हजार ८० ग्राहकांकडे २ कोटी ४७ कोटी आणि रत्नागिरी (ग्रामीण) मध्ये ८ हजार ८९१ ग्राहकांकडे ३ कोटी १९ लाखांची थकबाकी आहे.

या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, शहरी व ग्रामीण दोन्ही भागांतील ग्राहकांकडे मोठी थकबाकी आहे. जिल्ह्यात १ लाख ३ हजार ६८२ घरगुती ग्राहकांकडे १३ कोटी ८३ लाख, ११ हजार ३७ व्यावसायिक ग्राहकांकडे ४ कोटी ९६ लाख, तर ९२२ औद्योगिक ग्राहकांकडे १.६७लाखांची थकबाकी आहे. पथदीपांचे ९ कोटी ५६ लाख, जलव्यवस्थापनाचे ४ कोटी २४ लाख यांसह शासकीय कार्यालयांचे ९४ लाख थकीत आहेत. या आकडेवारीमुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत असून, भविष्यात वीजपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थकबाकी वाढल्याने महावितरण आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

कठोर पावले उचलणार… – ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. वीजपुरवठा खंडित करणे, थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करणे, असे उपाय योजले जाऊ शकतात. वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular