19.8 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeIndia'महिंद्रा है तो मुमकिन है' – आनंद महिंद्रा रिट्वीट

‘महिंद्रा है तो मुमकिन है’ – आनंद महिंद्रा रिट्वीट

गुजरातमधील या शहरातील पुराच्या पाण्यातून एक कार चालक महिंद्रा बोलेरो गाडी चालवताना दिसत आहे.

महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे परिणाम सर्व जगभर दिसायला सुरुवात झाली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये महिंद्राची बोलेरो गाडी पुराच्या पाण्यातून वाट काढताना दिसत आहे, आणि यावर महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओची दखल घेतली आहे.

गुजरात मधील जामनगर आणि राजकोटमध्ये तुफानी पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरामध्ये पूर्णत:  पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गुजरातमधील या शहरातील पुराच्या पाण्यातून एक कार चालक महिंद्रा बोलेरो गाडी चालवताना दिसत आहे. पुराचे पाणी गाडीच्या अर्धा उंचीपर्यंत आले असून, पाण्याला वेगही फार असल्याचे दिसून येत आहे. तरी सुद्धा तो चालक त्या पाण्यातून सहजपणे गाडी चालवताना दिसत आहे.

एका नेटकऱ्याने हा व्हिडीओ ट्विटवर अपलोड केला असून, त्यामध्ये त्याने त्या राजकोटचे पोलीस, राजकोटचे जिल्ह्याधिकारी आणि महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना टॅग सुद्धा केलं आहे. यानंतर आनंद महिंद्रा यांनी त्या व्हिडियोची दाखल घेत, तो व्हिडीयो रिट्विट करत आपली ‘महिंद्रा है तो मुमकिन है’  अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे आनंद महिंद्रा यांनी लिहले आहे कि, खरचं एवढ्या पावसाचं दृश्य पाहून मी स्वत: हैराण झालो आहे, पण हा चालक खूपच सऱ्हाईतपणे पाण्यातून मार्ग काढत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या स्पेशल रिट्वीटनंतर हा व्हिडीओ अजूनच व्हायरल होऊ लागला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular