25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeSindhudurg'त्या' अमेरिकन महिलेचा 'तो' बनावच, मानसिक आजार

‘त्या’ अमेरिकन महिलेचा ‘तो’ बनावच, मानसिक आजार

आर्थिक विवंचनेमुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले.

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील जंगलात सापडलेल्या त्या अमेरिकन महिलेचे रहस्य उलगडले आहे. ललिता ललिता काई कुमार एस. (रा. अमेरिका मॅसेच्युस) असे त्या महिलेचे नाव आहे. तिने सुरवातीला सांगितलेली माहिती खोटी होती. तिचे लग्नच झाले नसल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यांचे कुटुंब साईभक्त असल्याने तिचे नाव ललिता ठेवले. तामिळनाडू आश्रमात ती मॉडर्न डान्स आणि योगाचे क्लास घ्यायची; परंतु ती आर्थिक अडचणीत होती. पासपोर्ट आणि व्हिसासाठी गोव्याला यायची. आर्थिक विवंचनेमुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि ती जंगलात पोहचली.

तिच्या पायाला जखम असून ती अशक्त होती. आता त्यात सुधारणा झाली आहे. तिचे लग्नच झाले नसल्याचे तिने सांगितले. तिचे आई-बाबा साईभक्त आहेत. तिला स्किजोफ्रेनिया हा मानसिक आजार असल्याने गेल्या १० वर्षांपासून तिच्यावर गोव्यात उपचार सुरू होते. गोव्यात आल्यानंतर तिचा पासपोर्ट हरवला. या दरम्यान ती तामिळनाडू येथील आश्रमात होती. अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा देखील मिळवायचा होता; परंतु दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती खालावत गेली. याचा तिच्या मानसिकतेवर परिणाम झाला. आता जगण्यात काही अर्थ नाही या नैराश्येतून ती रोनापाल सोनुर्लीच्या जंगलात जाऊन स्वतःला डांबून घेतल्याचे तपासात पुढे आले आहे.

सावंतवाडीतील बांदा पोलिसांनी नुकताच तिचा ऑन कॅमेरा जबाब नोंदवला आहे. तिच्या प्रकृतीत आता ५० टक्के सुधारणा झाली. परदेशी त्रण म्हणून रुग्णालयात चांगली आरोग्यव्यवस्था केल्याने अमेरिकन दुतावासाने या सेवेचे खास कौतुक केले, अशी महिती प्रादेशिक अधिकारी डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. सावंतवाडीच्या रोनापाल सोनुर्लीच्या जंगलात साखळदंडाने बांधून ठेवलेल्या अमेरिकन महिलेबाबत नेमके काय घडले याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. या सर्व प्रकाराला कलाटणी देणारी माहिती तपासात पुढे आली आहे.

आपल्या पतीने आपल्याला या अवस्थेत येथे सोडले, असे या महिलेने पोलिसांना सांगितले होते. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तामिळनाडूत शोध घेतला. तिने दिलेल्या नावाची कोणतीही व्यक्ती तेथे आढळली नाही तसेच तिने जो पत्ता दिला होता तेथे घर नसून एक दुकान असल्याचे पुढे आले आहे. यामुळे हा काही वेगळाच प्रकार असल्याचा संशय बळावला. महिलेच्या चुलत भावाशी डॉ. फुले संपर्कात आहेत तसेच ऑनलाईन समुपदेशनदेखील सुरू आहे. फोनवरून तिच्या भावाशी चर्चा झाली आहे तसेच ललितादेखील बोलली आहे. तिच्या मानसिकतेत बराच फरक पडला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular