28.9 C
Ratnagiri
Wednesday, February 25, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeRatnagiriमालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

मालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

गावांमध्ये किती ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल ठेवता येथील याची पाहणी केली.

रत्नागिरी तालुक्यातील पातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव म्हणून ओळख देण्यासाठी सव्वा कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला केली. कवी केशवसुतांच्या मालगुंड गावाला ही ओळख करून देण्याचे स्वप्न तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांनी दाखविले होते. वाचन चळवळीला उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमांना राज्य शासनाकडून चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुस्तकांचे गाव हा एक त्यातील उपक्रम होता. त्यासाठी कोमसापचे संस्थापक विश्वस्त मधु मंगेश कर्णिक आणि कार्यकारी विश्वस्त रमेश कीर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. पुस्तकांच्या गावांसाठी केशवसुतांच्या मालगुंडच्या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरीही दिली गेली होती. मार्च २०२१ मध्ये भाषा विकास मंत्रालयाची एक समिती भाषा विकास मंत्रा होती. त्यावेळी केशवसुत स्मारकांमध्ये कोमसाप पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. प्राथमिक चाचपणीत ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांनीही हिरवा कंदील दिला होता.

प्रत्यक्ष भेटीवेळी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मालगुंड गावांमध्ये किती ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल ठेवता येथील याची पाहणी केली. यामध्ये गावातील शाळा, ग्रामस्थांची घरे, हॉटेल्स यांसह केशवसुत स्मारक ग्रंथालयाचा समावेश होता. या संबंधित ठिकाणी ग्रंथालयाप्रमाणे रचना केली जाणार असून, पुस्तक ठेवण्यासाठी दोन मोठे स्टॅण्ड, बसण्यासाठी खुर्ची-टेबल ठेवण्यात येणार आहे. संबंधित ठिकाणी प्रवेशद्वारावर पुस्तकांचे गाव म्हणून पाटीही लावली जाणार आहे. आवडीची पुस्तके वाचण्याबरोबरच त्याच्या विक्रीचीही व्यवस्था केली जाणार आहे. त्यामध्ये कादंबरी, कथा, कवितांचे दालन, चरित्रग्रंथ यासह वेगवेगळी पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. या निमित्ताने वाचन संस्कृतीला चालना मिळणार असून पर्यटनवाढीलाही मदत होऊ शकते. गणपतीपुळे येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यातील वाचन संस्कृतीशी निगडित पर्यटक मालगुंड येथे वळू शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular