26.2 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriप्रत्येक टिकेच उत्तर मी माझ्या कार्यपूर्तीमधून देतो – नाम. सामंत

प्रत्येक टिकेच उत्तर मी माझ्या कार्यपूर्तीमधून देतो – नाम. सामंत

शिवसेनेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय शिवसेना पदाधिकारी यांचे सोबत बैठका घेत असताना भाजप नेते राजू कीर यांनी ८ दिवसांपूर्वी मांडवी कुरणवाडी येथे क्रुझ टर्मिनल व्हावं ही मागणी घेऊन भेट घेतली होती. त्यावेळी सामंत यांनी देखील पक्षभेद बाजूला ठेऊन रत्नागिरीच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे त्यांना आश्वासन दिले होते.

सामंत यानी या भेटीदरम्यान सांगितल्या प्रमाणे ५ ऑक्टोबरला त्यांच्या मुंबई येथील दालनामध्ये बैठक संपन्न झाली. सामंत यांनी या बैठकीला मेरिटाईम बोर्डचे आयुक्त अमित सैनिक याना बोलावून रत्नागिरी कुरणवाडी येथे क्रूझ टर्मिनल होण्याबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी भाजपा नेते राजू कीर, माजी तहसीलदार शिवलकर, शिवसेना नगरसेवक नितीन तळेकर,विवेक सावंत आदी उपस्थित होते.

भाजपा नेते राजू कीर यानी मांडवी येथील क्रूझ टर्मिनल बाबत झालेल्या बैठकीबाबत समाधान व्यक्त करताना ,रत्नागिरीचा विकास करताना मी भाजपा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून उदय सामंत शिवसेनेचे मंत्री असून सुद्धा विकासाच्या आड राजकारण आणत नाहीत किंवा आम्हाला ते कधीही दुजाभाव देत नाहीत याबाबत समाधान व्यक्त केले.

राजू कीर यांनी जेंव्हा नाम. सामंतांची भेट घेतली होती, तेंव्हा अनेक चर्चांना पेव फुटला होता. परंतु, शिवसेनेच्या बैठकीमध्ये अचानक बीजेपीच कोणी येणे म्हटल्यावर अनेक अफवा उठवल्या गेल्या. नाम. सामंत याना याबाबत विचारले गेले असता, त्यांनी देखील रत्नागिरीच्या हितासाठी टीकाकारांची टिका विसरून काम करणं माझ्यासाठी महत्वाचं असून, प्रत्येक टिकेच उत्तर मी माझ्या कार्यपूर्तीमधून देतो. असे त्यांनी सांगितल. काम करून दाखविले कि, टीकाकारांची तोंड आपोआप बंद होतात.

RELATED ARTICLES

Most Popular