29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी अडिच कोटींचा ऐवज केला जप्त

पोलिसांकडून डमी ग्राहकाने फोन केला... मोठं गिऱ्हाईक...

रत्नागिरीतील मिरकरवाड्यात निघृण हत्त्या

शहरातील मिरकरवाडा खडप मोहल्ला येथे एका तरूणाचा...

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...
HomeRatnagiriलांज्यात खुलेआम जुगाराचा अड्डा, बड्या बड्यांचा समावेश

लांज्यात खुलेआम जुगाराचा अड्डा, बड्या बड्यांचा समावेश

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ले तिठा येथील हॉटेलच्यामागे उघड्या जागेमध्ये टेबल लावून जुगार खेळताना १३ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरा हि घटना घडली. याप्रकरणी शनिवार ११ डिसेंबरला मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये अनेक व्यापारी, उद्योजक, शिक्षण संस्था पदाधिकारी अशा मोठ्या लोकांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने लांजा तालुक्यात ही कारवाई केली.

यात एकूण ४४ हजार ५५९ रुपये हे एका टेबलवर तर दुसऱ्या टेबलवर १८ हजार ८७० रुपये अशी एकूण ६३ हजार ४२० अशी रोख रक्कम आणि २५ हजार ६८० रुपयाचे मोबाइल, टेबल-खुर्च्या व जुगारासाठी लागणारे पत्ते असा मुद्देमाल पकडण्यात आला. याबाबत लांजा पोलिस ठाण्यात या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्ले मुसलमानवाडी येथील अयुब हसन बोबडे याचे कोर्ले तिठा येथे थंडागरम हॉटेल आहे. या हॉटेलच्या मागील उघड्या जागेत अयुब बोबडे, सय्यद आमीन लांजेकर, अहमद आमद सारंग,  शांताराम अधटराव, वैभव गांगण, प्रशांत सीताराम गुरव, किशोर सोनू गुरव, राजेंद्र गांधी,  शरद लाखण, उमेश केशव बेर्डे, मारुती अनाजी साळुंखे,  संतोष ज्ञानदेव गांगण, नारायण परशुराम बेर्डे हे सर्वजण एकत्रितपणे पत्त्यांचा जुगार खेळ खेळत होते. याबाबतची खबर जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला प्राप्त झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून या सर्व आरोपींना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular