29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरीच्या सुकन्येची सर्वदूर “कीर्ती”

रत्नागिरीच्या सुकन्येची सर्वदूर “कीर्ती”

किर्तीला अभिनयाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना तिने तिचे इन्स्टाग्रामवर अपलोड केलेले व्हिडिओ पाहून निर्माते नंदा आचरेकर यांनी तिची या मध्यवर्ती भूमिकेसाठी निवड केली होती.

मेनिका नातूज चित्रांगण मुंबई निर्मित व ऍड. सौ. जया उदय सामंत यांच्या सहकार्यातून आज्जू हा मराठी लघुचित्रपट नुकताच फेस्टिवलसाठी प्रदर्शित केला आहे. पिकुली या महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे लेखक नंदा आचरेकर, दिग्दर्शक मनोज नार्वेकर आणि संकलक विजय खोचीकर हे एकत्र आले आहेत. ज्येष्ठ अभिनेते प्रफुल्ल सामंत यांनी आजोबाची तर नंदिनी उर्फ नंदा या नातीची भूमिका रत्नागिरीची कन्या कु. किर्ती उदय सामंत हिने साकारली आहे. किर्तीला अभिनयाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना तिने तिचे इन्स्टाग्रामवर अपलोड केलेले व्हिडिओ पाहून निर्माते नंदा आचरेकर यांनी तिची या मध्यवर्ती भूमिकेसाठी निवड केली होती.

रत्नागिरीची कन्या किर्ती उदय सामंत हिने अभिनय केलेल्या आज्जू या मराठी लघुपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये नामांकने मिळाली असून, आतापर्यंत तिला १५ पुरस्कार प्राप्त झाल आहेत. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे. हे यश मिळविणारी किर्ती ही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांची सुकन्या आहे.

या लघुपटात किर्ती बरोबरच मुद्रा, मुग्धा,  स्वरांगी, अर्थव, अष्ठमी, सौम्या, आर्य, परिणीता,  रेयांश आणि पाहुणा बालकलाकार आर्यन विलास पाटील या बालचमूसोबत संगीता काटकर, पूनम राणे, अँड. प्रशांत सावंत, दीपाली गुरव, तुषार साळवी, साक्षी पाकळे, पराग शेटये आणि रसिका जोशी यांनी सहाय्यक कलाकार म्हणून कामे केली आहेत. लवकरच मुंबईमध्ये मान्यवर चित्ररसिकांसाठी या लघुपटाचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे, असे लघुपटाचे सहनिर्माते विलास पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular