मागील २ वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे, अनेक देवाशाने बंद ठेवण्यात आली होती. ती काही महिन्यांपूर्वी उघडण्यात आली आहेत. कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण संपुष्टात आली नसली तरी प्रभाव मात्र काही प्रमाणात कमी झालेला, त्यामुळे लोक निर्धास्तपणे वावरू लागली. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना निर्बंधांची पायमल्ली करण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी धार्मिक स्थळे उघडण्यात आली असली तरी मात्र गर्दी होणाऱ्या यात्रा किंवा इतर काही मनोरंजनांच्या जत्रा यांवर बंदीच घालण्यात आलेली. अनेक जत्रा या कोरोना काळामध्ये रद्द करण्यात आल्या. यावर्षी सुद्धा अचानक उद्भवलेल्या नव्या व्हेरीयंट ओमिक्रोनमुळे आणि कोरोनोच्या नवीन नियमावलीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर व मठ धामापूर येथील सोमेश्वर देवस्थानच्या मानकरी, ट्रस्टी यांची देवरूख पोलिस ठाण्यात बैठक झाली. यात यात्रोत्सव होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन्ही देवस्थानातील मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत फक्त धार्मिक विधी सोहळा होईल, असा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसारच विधी कार्यक्रम होतील. कोव्हिड नियमांचे पालन करून मर्यादित स्वरूपात सर्व सोहळे फार पडतील, अशा सूचना पोलिस अधिकार्यांनी दिल्या. भाविकांनी याची नोंद घेऊन नियमांचा भंग करू नये, मंदिरात दर्शनाचा व सोहळ्याचा लाभ न घेता सहकार्य करावे, असे आवाहन मानकरी व ट्रस्टी यांनी केले आहे. विवाह सोहळा गतवर्षीप्रमाणेच साजरा केला जाणार आहे. परंतु त्या दरम्यान जी यात्रा भरते, ती भरविण्यात येणार नाही आहे. सध्या कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरोनाच्या वेगाने पसरणाऱ्या संसर्गाला आटोक्यात आणणे एवढच डोळ्यासमोर शासन ध्येय ठेवून आहे.