24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriरत्नागिरीचे मेडिकल कॉलेज सुरु, जिल्हावासीयांचे स्वप्न झाले पूर्ण

रत्नागिरीचे मेडिकल कॉलेज सुरु, जिल्हावासीयांचे स्वप्न झाले पूर्ण

राज्यभरातून आलेल्या ५० मुले आणि ५० मुलींना हॉस्टेलच्या खोल्या निश्चित करून दिल्या आहेत.

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा बुधवारी सकाळी नऊ वाजता फाउंडेशन कोर्सनी श्रीगणेशा झाला. एमबीबीएस होऊ इच्छिणारे १०० विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये सर्वांत जास्त मुंबईचे त्यानंतर कोल्हापूर, सांगली, विदर्भातील आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गातील प्रत्येकी चार विद्यार्थी आहेत. मंगळवारी या विद्यार्थ्यांना हॉस्टेल देण्यात आले. महाविद्यालयाला डॉक्टर ५ प्राध्यापक उपलब्ध झाले असून, उद्या या विद्यार्थ्यांची सिव्हिलला त्यानंतर प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देऊन प्राथमिक माहिती दिली जाणार आहे, असे रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.

तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शैक्षणिक हब बनवण्याच्यादृष्टीने टाकलेली पावले आता प्रत्यक्षात उतरत आहेत. जिल्हावासीयांचे रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. १०० विद्यार्थ्यांचा प्रवेश पूर्ण झाल्यानंतर आज प्रत्यक्ष महाविद्यालयाचा श्रीगणेशा झाला. सकाळी नऊ वाजता लेक्चर हॉलमध्ये स्वतः डीन रामानंत यांनी फाउंडेशन कोर्सच्यादृष्टीने मार्गदर्शन केले. वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे काय, याची पायाभूत माहिती त्यांनी दिली. महाविद्यालयासाठी ३० डॉक्टरांची पदे मंजूर असून, आतापर्यंत ५ डॉक्टर प्राध्यापक हजर झाले आहेत.

सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत महाविद्यालय सुरू राहणार आहे. राज्यभरातून आलेल्या ५० मुले आणि ५० मुलींना हॉस्टेलच्या खोल्या निश्चित करून दिल्या आहेत. काही ठिकाणी एका रूममध्ये दोन, काही ठिकाणी एका रूममध्ये चार विद्यार्थी अशी व्यवस्था आहे. कॉट, कपाट, टेबल, पाणी, लाईट अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे रेल्वेमुळे येणे-जाणे सोयीचे असल्याने पालकांनी या महाविद्यालयाला अधिक पसंती दिल्याचे मुंबईहून आलेल्या पालकांनी सांगितले. एमबीबीएसच्या १०० जागा भरण्यात आल्या असून, यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाचा जागांचा कोटा आहे. राज्य शासनाच्या ८५ जागा तर. केंद्राच्या १५ जागांचा कोटा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular