27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...
HomeRatnagiriजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार, आमदार राजन साळवी आक्रमक

जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार, आमदार राजन साळवी आक्रमक

संतापलेल्या नातेवाईकांनी आमदार राजन साळवी यांच्याकडे तक्रार केली.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल) अपघात विभागात मंगळवारी (ता. १६) मध्यरात्री सुमारे ४ तासांहून अधिक काळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याची तक्रार आल्यानंतर आमदार राजन साळवी यांनी तिकडे धाव घेतली. उपस्थितांना धारेवर धरत रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे आमदार साळवी यांनी वाभाडे काढले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) येत नाहीत तोपर्यंत जिल्हा रुग्णालयातून हलणार नाही, अशी भूमिका घेत साळवी आक्रमक झाले होते. काही कालावधीनंतर आलेल्या डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यापुढे विषय मांडले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे हा जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कायमचा प्रश्न आहे. अनेक सत्ता आल्या, अनेक मंत्री झाले; पण जिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न जैसे थे आहे. रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्हा रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) यांच्याकडे आहे. महाविद्यालयाला प्राध्यापक मिळाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न सुटेल, असे अपेक्षित होते; परंतु त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्याचा फटका रुग्णांना बसला आहे. मंगळवारी (ता. १६) रात्री जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात एक रुग्ण दाखल झाला; परंतु चार तास झाले तरी त्या रुग्णाला बघण्यासाठी एकही डॉक्टर आला नाही.

त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी आमदार राजन साळवी यांच्याकडे तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेत आमदार साळवी तत्काळ जिल्हा स्रणालयात दाखल झाले. त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन येत नाहीत तोपर्यंत जिल्हा रुग्णालयातून हलणार नाही, अशी भूमिका आमदार साळवी यांनी घेतली. त्यानंतर डीन रामानंद जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल झाले. त्या वेळी आमदार साळवी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.

ही परिस्थिती गंभीर असून, यामध्ये रुग्णांचे हाल होता कामा नये, अशी अपेक्षा बोलून दाखवत कॉलेजच्या डीनना धारेवर धरले. जिल्हा रुग्णालयामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातून रुग्ण येतात. अशा वेळेला डॉक्टर उपलब्ध नसतील तर रुग्णांनी नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न साळवी यांनी उपस्थित केला. आपण स्वतः यामध्ये लक्ष घालणार असून, राज्य शासनाला याबाबत भूमिका घेण्यास भाग पाडू, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular